Homeघडामोडीरस्ता गटारे यापलीकडे विकास आहे हे दाखवून देणार - खोराटे

रस्ता गटारे यापलीकडे विकास आहे हे दाखवून देणार – खोराटे

अमित गुरव ( चंदगड )-: दौलत कारखाना कामगार आणि चेअरमन हे आमचं कुटुंब आहे आमच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाहीत. अथर्व दौलत कारखान्याचे कामगार खोराटे यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांना विधानसभेत पाठवणारच असा निर्धार कामगारांनी एकमताने केला. दौलत कारखाना बंद करण्याचे प्रयत्न एक नेता करत असेल तर आम्ही त्यांचा डाव उधळून लावू असे मत कामगार युनियन संघटनेचे प्रदीप पवार यांनी व्यक्त केले ते दौलत कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते . हनुमंत पाटील नारायण तेजम यांची यावेळी मनोगते झाली.
चंदगड तालुक्यात निसर्ग संपदा अधिक आहे पण रस्ते गटार या पलीकडे विकासाच झाला नाही असे पडखर मत चेअरमन मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केले. जर मी आमदार झालो तर रोजगार पर्यटन आणि सर्वांगीण विकास करण्याचं लक्ष असून त्यासाठी मला विधानसभेत पाठवण्याचे आवाहन खोराटे यांनी केले. कारखाना चालवत असताना अनेक संकटे आली आणि येतील त्याला आळा घालण्याची राजकीय ताकत आवश्यक आहे आणि कामगार शेतकरी वाहतूक संघटनेच्या पाठबळावरच मी विधानसभेच्या मैदानात उतरतोय तुम्ही मला साथ द्या असा विश्वास आहे , गडहिंग्लज चा गोड साखर चालवण्यासाठी मिळाला तर तोही घेऊ असे मत त्यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमासाठी संचालक विजय पाटील सीईओ (CEO) विजय मराठे , जनसंपर्क अधिकारी दयानंद देवण , महादेव फाटक, प्रदीप पवार ,संजय देसाई, संजय हाजगुळकर ,अशोक गावडे यासह कामगार उपस्थित होते . अश्रू लाड यांनी सूत्रसंचालन तर आनंदा कांबळे यांनी आभार मानले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular