महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेतली जाईल असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत त्यामुळे राज्यात निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे निवडणूक लाडकी बहीण योजनेमुळे लांबणीवर पडली अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
यावर खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की , निवडणूक आयोगासारखी संविधानिक संस्था जर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या दबावाखाली काम करत असेल तर देशात लोकशाही आहे कुठे? असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. लाडकी बहीण ही योजना मतदारांच्यावर प्रभाव टाकण्यासाठीच आहे. महाराष्ट्रात जर डिसेंबर मध्ये निवडणूक होणार असेल तर ही सत्ताधाऱ्यांच्या सोयीचे आहे आता निवडणुकीतली तर आपला पराभव होईल असा ठाम विश्वास आणि भीती असतात त्यांना आहे त्यामुळेच त्यांनी हा डाव टाकला आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.
निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू-काश्मीरची निवडणूक जाहीर केली आहे. त्याचबरोबर झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर व्हायला हरकत नव्हती पण सत्ताधाऱ्यांना हेमंत सोरेन यांचा पक्ष फोडायचा आहे म्हणून झारखंड आणि लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र निवडणूक पुढे घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
मुख्यसंपादक