Homeघडामोडीव्यंकटराव हायस्कुल येथे संस्कार शिबिर संपन्न

व्यंकटराव हायस्कुल येथे संस्कार शिबिर संपन्न

आजरा(हसन तकीलदार) येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये संस्कार शिबिर अंतर्गत इयत्ता नववी व दहावी या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व संस्कृत या विषयाचे मार्गदर्शन शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे हायस्कूल इचलकरंजी येथील इंग्रजी विषयाच्या अध्यापिका भाग्यश्री प्रवीण चिकोर्डे यांनी केले.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील इचलकरंजी येथील शाखेत भाग्यश्री चिकुर्डे यांनी जवळ जवळ 22 वर्ष इंग्रजी व 100 गुणांचे संस्कृत हे दोन्ही विषय प्रभावीपणे शिकवत नेहमी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. त्यांच्या अध्यापनाचे कौशल्य व संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी त्यांनी राबवलेले विविध उपक्रम त्यांनी आजच्या विद्यार्थ्यांच्या या संस्कार शिबिर अंतर्गत व्याख्यानमालेत सांगितले. त्याचबरोबर दोन्ही विषयाच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या वेळेत कशा सोडवायच्या याबद्दलही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा सचिव अभिषेक शिंपी, संचालक सचिन शिंपी, सुधीर जाधव ,प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे. शेलार व प्रशालेतील इंग्रजी व संस्कृतचे सर्व अध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सूत्रसंचालन पी.व्ही. पाटील यांनी केले, वक्त्यांचा परिचय व्ही.एच. गवारी व आभार सौ. एस.डी.इलगे यांनी मानले.

📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!

📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!

📺 यूट्यूब चॅनेल: 👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk

📘 फेसबुक पेज:👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

🌐 वेबसाईट:

www.linkmarathi.com

🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!

📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular