आजरा (हसन तकीलदार ):-आजऱ्यातील संवेदना फाउंडेशन सामाजिक, शैक्षणिक तथा विधायक कार्यात आपला ठसा उमठवला आहे. वनऔषधी पार्क असो अथवा वृक्षलागवड अशा अनेकविध सामाजिक कार्यात संवेदनाने आपले नाव कोरले आहे. सालाबाद प्रमाणे पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा येथे कै. भूषण गुंजाळ यांच्या स्मृतप्रित्यर्थ अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप संवेदना फाउंडेशन व भूषण गुंजाळ मित्र मंडळातर्फे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवेदना भूषण टीमचे प्रमुख संजय हरेर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे व संजीव देसाई (मुख्याध्यापक दीनदयाळ विद्यालय)हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक तानाजी पावले यांनी केले. प्रास्ताविक करताना तानाजी पावले म्हणाले कि, संवेदना फाउंडेशन ही एक सेवाभावी समाजसेवी संस्था आहे. आजपर्यंत या फाउंडेशनमार्फत अनेक सामाजिक कार्यें केली आहेत. कै. भूषण गुंजाळ स्मृतीदिनानिमित्य भूषण गुंजाळ मित्र मंडळ व संवेदना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आजरा तालुक्यातील ज्या विद्यार्थ्यांचे आई वडील हायात नाहीत अशा पाहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व नित्योपयोगी साहित्य वाटप करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे या विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणीसह औषधोपचार संवेदना डॉक्टर टीम व मेडिकल असोसिएशन आजरा यांचेमार्फत करण्यात आले आहे. पुढे ते म्हणाले कि, आतापर्यंत हा कार्यक्रम फक्त आजरा तालुक्यापुरता मर्यादित होता मात्र यापुढे आजरा तालुक्याबरोबर चंदगड, गडहिंग्लज व भुदरगड याही तालुक्यात राबविण्याचा मानस आहे.
यावेळी गडहिंग्लज तालुका संवेदना प्रतिनिधी एम. ए. पाटील, चंदगड संवेदना प्रतिनिधी अजित गणाचारी, गोपाळ गडकरी, सुधीरभाऊ कुंभार (संचालक दीनदयाळ विद्यालय), कृष्णा खाडे, जीवन आजगेकर, अन्याय निवारण समितीचे सर्व सदस्य, पालक, विद्यार्थी आदिजण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संवेदनाचे सचिव संतराम केसरकर यांनी आभार मानले
🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काचे व्यासपीठ – Link Marathi 🌿
तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.
🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!
🎙️ Follow Us 🎙️*You Tube चॅनेल लिंक*👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=9fVf1D0sqOPFWHQS
*व्हाट्सअँप चॅनेल लिंक* 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



