यापुढील काळात शेतकरी केंद्रस्थानी ठेवून काम करणार – शाहू महाराज
आजरा (अमित गुरव) -: देशात पुन्हा भाजप सरकार आले तर हुकूमशाही येऊ शकते त्यामुळे जनतेने भुलून जाऊन त्यांना मतदान करू नये असे मत शाहू महाराज यांनी आजरा येथील प्रचार सभेत बोलताना व्यक्त केले. महाराष्ट्र हा देशात अग्रेसर होता पण या सरकारने उद्योगधंदे धुळीस मिळवले होते ते गुजरात मद्ये पळवले त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण केली आहे.
आजरा तालुक्यात घनसाळ, बांबू , काजू , याचे प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास रोजगार संधी मिळू शकते. यापुढील काळात शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून काम करणार असल्याचे आश्वासन शाहू महाराज यांनी दिले. तसेच आम्ही लवकरच आजरा येथे संपर्क ऑफिस चालू करू म्हणजे सर्वांना संपर्कात राहता येईल असे बोलले.
चंदगड मधून सायकल वरून आलेला एक कार्यकर्ता सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. कारण त्याने प्रत्येक सभेला सायकल वरून हजेरी लावली. आणि त्याचा ड्रेस कोड काँग्रेस ची जाहिरात करणारा होता हे विशेष..
मलिंग्रे येथे महिलांनी लेझिम पथक हा पारंपरिक पद्धतीने केलेले स्वागत हे लक्षवेधी ठरले .
सभेत कॉ. संपत देसाई , जयवंत शिंपी , संजय तडेकर , प्रकाश पाटील, यांनी आपली मनोगते व्यक्त केली ज्यामध्ये संविधान वाचवण्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवले नाहीतर हिटलरशही सुरू होईल असे ते म्हणाले. या सभाना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही. बी पाटील , ए वाय पाटील , गोकुळ संचालक अंजना रेडेकर , मुकुंद देसाई , राजेंद्र सावंत , सुनील शिंत्रे , उदय पवार , रणजित देसाई , संकेत सावंत , उमेश आपटे , रवींद्र भाटले, उत्तम देसाई , प्रियांका जाधव , किरण कांबळे , संभाजी पाटील , संजय सावंत , रशीद पठाण , नंदाताई बाभुळकर , रामराजे कुपेकर, अमर चव्हाण , तसेच राष्ट्रवादी , काँग्रेस , शिवसेना , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
मुख्यसंपादक