Homeघडामोडीसंदीप चोथे यांच्या दातृत्वाचा आदर्श समाजाने घ्यावा : डॉ. पोवार

संदीप चोथे यांच्या दातृत्वाचा आदर्श समाजाने घ्यावा : डॉ. पोवार


आजरा ( प्रतिनिधी )-
विद्या मंदिर, बहिरेवाडी (ता आजरा) च्या प्राथमिक शाळेस, डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन चे विश्वस्थ व माजी सैनिक सुपुत्र संदीप चोथे यांनी ४ संगणक संच प्रदान केले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचा आदर्श आज च्या समाजाने घ्यावा असे प्रतिपादन डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन व विद्यार्थी विकास परिषद, कोल्हापूर चे अध्यक्ष डॉ. सचिन पोवार यांनी केले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हे संगणक संच प्रदान करण्यात आले.गावच्या लोकनियुक्त सरपंच रत्नजा सावंत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
संदिप चोथे हे बहिरेवाडी येथील माजी सैनिक विष्णू चोथे यांचे सुपुत्र असून ते सेनिकॉर्न टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे चे असिस्टंट मँनेंजर आहेत तसेच डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन चे ट्रस्टीही आहेत. संदीप चोथे व डॉ. प्रियांका चोथे व चोथे परिवार यांच्या वतीने हा संगणक संच प्रदानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलताना विश्वस्थ संदीप चोथे म्हणाले की, अजूनही आपला ग्रामीण भाग म्हणाव तितका शैक्षणिक शैक्षणिक दृष्ट्या प्रगत नाही.म्हणून आम्ही फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध शिक्षण उपयोगी कार्यक्रम घेत असतो. नुकतेच आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत आयडेंटी कार्ड, शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.माझे वडील माजी सैनिक विष्णू चोथे व डॉ. पोवार यांच्या प्रेरणेतून आंम्ही हा गावच्या विद्यार्थ्यांना संगणक संच दिले.यातून विद्यार्थ्यांचा सखोल अभ्यास व्हावा हा आमचा हेतू आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही। संगणक हाताळण्यास देऊन या विद्यार्थ्यांना कुशल करण्याचे काम शिक्षकांनी करावे. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या देशाचे भविष्य आहे.त्यांनी आजी- माजी सैनिकांचा आदर्श घेऊन प्रेरित व्हावे.
आजी -माजी सैनिक तालुका वेल्फेअर असोसिएशनचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष कुमार पाटील म्हणाले की, आजपर्यंत कोणत्याही माजी सैनिकाच्या कुटुंबाने प्राथमिक शाळेत एवढ्या मोठ्या ४ संगणक संचाची मदत केली नाही.ती मदत चोथे कुटुंबियाकडून पुर्ण झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा, लोकनियुक्त सरपंच रत्नजा सावंत म्हणाल्या की, माजी सैनिक विष्णू चोथे यांनी देशसेवा करूनही गावातील मुलांच्या विषयी असलेली आत्मीयता मुलांना मोठे ज्ञान देवून जाणारी आहे. चोथे परिवाराचे हे काम स्तुत्य आहे.
या वेळी बोलताना मुख्याध्यापक तुकाराम काटवळ म्हणाले कि, दिलेल्या ४ संगणक संचाचा निश्चितच विद्यार्थ्यांना उपयोग केला जाईल व कुशल विद्यार्थी घडवण्याचे काम आंम्ही शिक्षक स्टाफ अनिश्चित करू. शाळा व्यवस्थापन समिती ते अध्यक्ष अरविंद मिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळीआजी-माजी सैनिक तालुका वेल्फेअर असोसिएशन गडहिंग्लज तालुकाध्यक्ष कुमार पाटील व सचिव रामकृष्ण शेंडे, लोककला महोत्सवाचे प्रमुख गणपती नागरपोळे (सर) डॉ. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद मिसाळ व त्यांचे सर्व सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी,बहिरेवाडी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुनील चव्हाण, सदस्य जनार्दन कापसे, रामचंद्र कापसे, माध्याळ सैनिक संघटने सचिव मीनिन रॉड्रिक्स, अजित मगदुम, उत्तम आयवाळे, प्रीती कांबळे, अरुणा यादव, विठ्ठल कदम, अशोक जोधळे, पाटील सर,संजय पोवार, अमित कडाकणे , ओमकार मिरजकर, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व जाणकार नागरिक महिला, आदीसह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रस्ताविक व स्वागत शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या व ग्रा.प. सदस्या डॉ.उल्का गोरुले यांनी केले.सूत्रसंचालन डी एल.चौगले सर यांनी तर आभार तानाजी गिरी सर यांनी मानले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular