Homeघडामोडीकोणत्याही परिस्थितीत एस टी सेवा सुरु करा - तहसीलदार समीर माने

कोणत्याही परिस्थितीत एस टी सेवा सुरु करा – तहसीलदार समीर माने


आजरा(हसन तकीलदार):-पेरणोली- गारगोटी रस्त्याच्या सुरु असलेल्या कामामुळे गेले तीन महिने देव-कांडगाव येथे बंद असलेल्या बस सेवेबाबत काही दिवसांपूर्वी भूमिपुत्र युवा फाउंडेशन आजरा व देव कांडगाव ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत आजऱ्याचे तहसीलदार श्री समीर माने यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करत लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.आणि बस सेवा सुरु करणेबाबत सूचना दिल्या.

  मागील तीन चार महिन्यापासून देवकांडगाव बस सेवा बंद असल्यामुळे प्रवास्यांचे व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. याबाबत भूमिपुत्र फाउंडेशन तर्फे निवेदन देऊन याबाबत विचारणा केली असता यावेळी संबंधित बांधकाम कंपनीचे प्रतिनिधी श्रीशैल मलकूड व आजरा बस आगार प्रमुख प्रविण पाटील यांना उपस्थित ठेवून ही अडचण सोडवून देण्याच्या संदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या. बस सेवा बंद असल्याने शाळेची मुले, वयोवृद्ध लोक, रुग्ण तसेच इतर नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल रणजीत सरदेसाई यांनी एसटी प्रशासन व संबंधित बांधकाम कंपनीच्या प्रतिनिधीना चांगलेच धारेवर धरले आणि जाब विचारला. शेवटी  तहसीलदार समीर माने यांच्या मध्यस्थीने कोणत्याही परिस्थितीत उद्या दिनांक 29 ऑगस्ट 2025पासून बस सेवा सुरळीत करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला. एसटी सुरू करताना ज्या ठिकाणी अडचणी येतील तेथे संबंधित बांधकाम कंपनीने सहकार्य करून त्यातून अडचणी दूर करून बस सेवा सुरळीत करण्यात मदत करण्याचे आश्वासन यावेळी बांधकाम कंपनीकडून देण्यात आले. भूमिपुत्र युवा फाउंडेशनने घेतलेली भूमिका आणि तहसीलदार समीर माने यांनी दाखवलेली कार्यतत्परता याबाबत देव- कांडगाव ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.

यावेळी भूमिपुत्रचे रणजीत सरदेसाई, विष्णू कुंभार, , राजाराम येसादे, संबंधित बांधकाम कंपनीचे प्रतिनिधी, देव कांडगाव गावचे सौ. स्वप्नाली राणे, धीरज राणे, जनार्दन देसाई,संभाजी तेजम,रेखा परीट, गौरी चव्हाण, नित्यानंद परीट, सचिन देसाई, स्वप्नील तेजम, मारुती तेजम, पांडुरंग देसाई, गणपती राणे, शिवाजी गिलबिले, रमेश कांबळे, रामदास तेजम, जितेंद्र देसाई तसेच महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular