आजरा (हसन तकीलदार) बहुजन मुक्ती पार्टीचे, चंदगड विधानसभा सचिव मा. अमित सुळेकर यांना काही महिन्यांपासून मोबाईल नसल्याने काम करण्यात अडचणी येत होत्या. बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते निरंतर समाजात काम करतात परंतु त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल असणे सध्याची मूलभूत गरज बनलेली आहे. अमित सुळेकर जे सध्या राधानगरी, चंदगड व कागल विधानसभांमध्ये पूर्ण वेळ पार्टीसाठी काम करत आहेत, त्यांचा मोबाईल गेल्या काही महिन्यांपासून बिघडला होता. याची माहिती जेव्हा पार्टीचे एक समर्थक (स्वतःचे नाव त्यांनी गुपित ठेवण्यास सांगितले आहे) यांना समजल्यावर त्यांनी पोकोचा अँड्रॉइड फोन अमित सुळेकर यांना संघटनेच्या कामासाठी दिलेला आहे.
अमित सुळेकर हे सामाजिक कार्यासाठी झोकून घेतलेले व्यक्तिमत्व. बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांचे एक वैशिष्ट म्हणजे निःस्वार्थ पणे सामाजिक कामात अथवा आंदोलनात झोकून देतात. संविधानाच्या चाकोरीत काम करणे हा त्यांचा हाथखंडा. कोणाच्या चहाची अपेक्षा न ठेवता स्वतः काम करतात. बहुसंख्य कार्यकर्त्यांची आर्थिक परिस्थितीही जेमतेम आहे. त्यामुळे बऱ्याचदा मर्यादा येतात तरीसुद्धा या मर्यादावर मात करीत हे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतात याचीच ही पोहच पावती आहे.याचा अर्थ असा की बहुजन मुक्ती पार्टीचे काम लोकांना पसंत पडत आहे, लोकांना बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांवर विश्वास निर्माण होत आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते निरंतर समाजाची कामे करतात. त्याचे श्रेय इतर कोणीही घेतले तरीही समाजात मात्र सगळ्यांना माहीत असते की हे काम कोणामुळे झालेले आहे.कोणतेही काम करताना त्याचा शेवट पर्यंत चिकाटीने लढा देणे हे बहुजन मुक्ती पार्टीचे वैशिष्ट आहे. अशा अनेक लढ्यात संविधानिक पद्धतीने त्यांनी यश संपादन केले आहेत म्हणूनच अमित सुळेकर यांना मोबाईल च्या स्वरूपात स्वतःचे योगदान देऊन समर्थकांनी पार्टीला समर्थन दिलेले आहे.
निश्चितच त्यांच्या या विश्वासावर बहुजन मुक्ती पार्टी पात्र ठरेल असा बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ. उल्हास त्रिरत्ने व राष्ट्रीय सचिव नवी दिल्ली ऍड. विद्या त्रिरत्ने यांनी विश्वास व्यक्त केला
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक



