उत्तूर ( प्रतिनिधी ):भाऊ-बहीणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत भादवण गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. माधुरी गाडे यांनी पोलिस बांधवांना राखी बांधून एक वेगळा आणि स्तुत्य उपक्रम राबविला.
सौ. गाडे यांनी सांगितले की, “पोलिस प्रशासनात कार्यरत असताना अनेकांना आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे करावे असे मला वाटले.
“या उपक्रमांतर्गत उत्तूर पोलिस ठाण्यातील हवालदार जमीर मकानदार, सुदर्शन कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश मोरे आणि कर्मचारी सुधाकर हुले यांना राखी बांधून औक्षण करण्यात आले.

या वेळी प्राचार्य रणजित गाडे, विठ्ठल उत्तूरकर, शिवाजी कुंभार, श्धोडीराम सावंत, संदेश रायकर, सूर्यकांत पाटील, बाळासाहेब कुंभार, संदीप सुतार, विजय गाडे, सगर खुळे, प्रदीप लोकरे, दीपक अमनगी यांच्यासह महिला मंडळी उपस्थित होत्या.कार्यक्रमाबद्दल हवालदार सुदर्शन कांबळे यांनी आभार मानले.
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
You Tube लिंक 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

मुख्यसंपादक



