Homeकृषीहापूसची पहीली पेटी मालवणवरुन नाशिकला रवाना ; या पेटीला विक्रमी भाव

हापूसची पहीली पेटी मालवणवरुन नाशिकला रवाना ; या पेटीला विक्रमी भाव


आंब्याचा खरा हंगाम सुरू होण्यासाठी अजूनही तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे. मात्र योग्य देखभाल आणि काळजी करुन हे फळ लवकर पिकविण्याचा मान सलग चौथ्यांदा मालवण कुंभारमाठ येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार फोंडेकर यांना मिळाला आहे.

कोकणातून हापूस आंब्याची या वर्षांची पहिली पेटी मालवण कुंभारमाठ येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार डॉ.उत्तम फोंडेकर यांच्या बागेतून नाशिकसाठी रवाना झाली आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना डॉक्टरेट प्रदान केली असून मालवण तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे यश मिळविले आहे. उत्तम फोंडेकर आणि सुर्यकांत फोंडेकर बंधूंचे कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी अभिनंदन केलेले आहे.              

दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर त्यांनी चार डझन आंब्यांची पेटी थेट ग्राहकाला विकली आहे. या पेटीला त्यांना 25 हजाराचा विक्रमी भाव मिळाला आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular