Homeकृषीबियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी…

बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी…

आजरा -: (अमित गुरव ) – खरीप हंगाम 2022 मध्ये शेतकऱ्यांनी खते बियाणे कीटकनाशके खरेदी करताना खालील प्रमाणे काळजी घ्यावी असे आवाहन कृषी अधिकारी पंचायत समिती आणि तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.

1) गुणवत्ता आणि चांगल्या दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत परवानाधारक कृषी निविष्ठा विक्रेत्याकडूनच बियाणे व कीटकनाशके खरेदी करावीत.

2) बनावट व भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून सिलबंद वेष्टनातील लेबल असलेले बियाणे वापरावे

3)बियाणे खरेदीची पावती , बियाणांचा संपूर्ण तपशील उदा. पिक , वाण , संपूर्ण लॉट नंबर , बियाण्याच्या कंपनीचे नाव , गाव सही असलेली रोख किंवा उधारीची पावती घ्यावी.

4) वैद्य बियाणे घ्यावे मुदतीच्या आतीलच बियाणे खरेदी करावे .

5) MRP पेक्षा जास्त किंमत देऊ नये.

6) बियाणे खरेदीची पावती , व त्या पिशवीतील थोडे बियाणे कापणी होई पर्यंत ठेवावे.

7) विक्रेता जर पावती देण्यासाठी टाळाटाळ करत असेल , मुदत संपलेले किंवा छापील किंमती पेक्षा अधिक किंमत घेत असल्यास त्याची लेखी तक्रार तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे करावी.

8) वेगवेगळ्या वाणाचे बियाणे एकत्र करून बियाणे वापरू नये.

असे आवाहन तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती यांनी केले आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular