Homeक्राईमआजरा तालुक्यात चोरीच्या घटनांनी खळबळ

आजरा तालुक्यात चोरीच्या घटनांनी खळबळ

प्रतिनिधी ( आजरा ) – मसोली तालुका आजरा येथे एका रात्रीत ३ ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रकार घडला. मसोली गावचे रहिवासी सध्या कामानिमित्त बाहेरगावी बाहेर असतात अश्या संभाजी गुंडू गुरव ( वय ६५) , तानाजी चंद्रकांत पोवार , शिवाजी आप्पा गुरव यांच्या बंद घरावर अज्ञात चोरट्यानी हात साफ केले. चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता.

यामध्ये १,२०,००० किंमतीचा २०ग्रॅम वजनाचा लक्ष्मी हार , ७५, ००० रुपयांची १२.५०ग्रॅम बोर माळ, ७५,०००रू. किमतीचे १२.५० ग्रॅम वजनाचे काळे मनी व सोन्याचे मनी असलेले गंठण ४ ग्रॅम वजनाची २४००० रू. अंगठी , ५००० रुपयांचे चांदीचे ३ छल्ले व एक पैंजण , ४५, ०००रोख रक्कम त्यात ५०० व १०० च्या चलनी नोटा, ६०,००० किमतीची लहान मुलींच्या गळ्यातील चैन, असा अंदाजे  ४,०४,००० मुद्देमाल तसेच ३०,००० रुपये किमतीचे दिड किलो किमतीचे मुलाच्या बारशात आलेली चांदीची दागिने , ६००० रुपये रोख ज्यात १०० आणि ५० रुपयांच्या भारतीय चलनी नोटा असा ३६,०००रुपयांचा ऐवज लंपास केला. अधिक तपास  पो. स. ई एस. एन, पाटील करत आहेत. 
           चौकट -:   तालुक्यात चोरीच्या घटनांनी खळबळ उडाली असून नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असलेले पण गावी स्वप्नातील छोटेसे घर साकार करणाऱ्याची झोप उडवण्याचा प्रकार घडत आहेत. कमी पोलीस स्टाफ मुळे पोलीस प्रशासनाला याला आळा घालणं कठीण असलं तरी आजरा पोलीस लवकरच अश्या चोरट्यांचा बंदोबस्त करतील असा तालुका वासियांना विश्वास आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular