अमित गुरव ( आजरा ) -: आजरा शहरातील गटारीचे व शौचालयाचे पाणी डायरेक्ट नदीत जात असल्याने शहरात आणि परिसरात कावीळ आणि टायफाईड चे रुग्ण वाढत आहेत. आजरा सोबतच मुरुडे, बुरुडे, हत्तीवडे, बोलकेवाडी येथे ही रुग्ण संख्या वाढण्यास आजरा नगरपंचायत जबाबदार असल्याचा आरोप करून आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती अध्यक्ष परशुराम बामणे आणि रहिवासी यांनी ऑफिस मध्ये जाब विचारत बोंब ठोकली.

आश्वासने कधी पूर्ण करणार आणि आजरेकरांचा पाण्यासाठीचा संघर्ष कधी संपणार असे तिखट प्रश्न विचारत अधिकाऱ्यांना भंडावून सोडलं.

मुख्यसंपादक