Homeघडामोडीआजरा / आंबोली राष्ट्रीय महामार्गावरील टोलची जागा बदलावी - कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय...

आजरा / आंबोली राष्ट्रीय महामार्गावरील टोलची जागा बदलावी – कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग – शिवसेना उभाठा गट यांचे

आजरा.- प्रतिनिधी.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की, संकेश्वर बांदा चा राष्ट्रीय महामार्ग व आजरा ते आंबोली या दरम्यान आजरा तालुक्यातील आजरा शहरापासून जवळच असणाऱ्या एम.आय‌.डीसी जवळ टोलचा नाका होणार आहे असे समजते पण या ठीकाणी टोलनाका झाल्यानंतर आजरा तालूक्यातील आजरा ते किटवडे या भागातील स्थानिक नागरीकांना या टोल नाक्याचा नाहक त्रास होणार आहे. कारण आजरा तालूक्यामध्ये आजरा शहर हे एकमेव बाजारपेठ असलेले शहर आहे. त्यामूळे मसोलीपासून किटवडे पर्यंत जवळजवळ १५ गावातील नागरीक आजरा शहरामध्ये बाजारासाठी व शासकिय कामासाठी दररोज ये जा करत असतात. तर एम.आय. डीसी येथे टोल नाका झाला तर या सर्व गावातील नागरिकांना या टोलवर थांबून त्यांचा वेळ वाया जाणार त्याच बरोबर इतरही त्रास होणार आहे. त्यामुळे या टोल नाक्याची जागा बदलून ज्या ठिकाणी कोल्हापूर ची हद्द संपते ते किटवडे व सिंधूदूर्ग च्या हद्दीवर हा टोल व्हावा. स्थानिक नागरिकांची मागणी आहे तरी या बाबत आपल्या अधिकारी व आजर तालुक्यातील नागरीकांची बैठक आजरा तहसिलदार यांच्या दालनात व्हावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर प्रा. सुनिल शिंत्रे जिल्हाप्रमुख कोल्हापूर, युवराज पोवार शिवसेना तालुका प्रमुख आजरा , राजु रेडेकर शिवसेना चंदगड विधान सभा परिक्षेत्रप्रमुख यांच्या सह्या आहेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular