आजरा ( अमित गुरव) – मडिलगे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निळ वादळ या ग्रुप च्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी बौद्ध उपासक , उपासिका आणि विशेषतः बालचमू यांचा उत्साह अवर्णनीय होता.
यावेळी लहान मुलांसाठी भाषण स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सर्वांना वही पेन बक्षीस म्हणून देण्यात आले . त्याच बरोबर गोवा येथे बोर्ड मध्ये प्रथम आल्याबद्दल श्रुती कांबळे हिचा मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला..

लहान मुलांच्या मनोरंजनासाठी संगीत खुर्ची घेण्यात आली आणि अनुक्रमे तीन विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते जनाई चायनीज सेंटर चे सर्वेसर्वा रविंद्र विजय कांबळे यांनी उपस्थित समाज बांधव तसेच ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.


मुख्यसंपादक