आईचे छत

आई नावाचं छत हरवलय
म्हणून जीवनात काही नाही उरलय,
आई लाड माझे खूप केलेस ग
पण आज माझ्यासोबत नाही आहेस ग

सुखा मध्ये आता रस नाही
कारण तू माझ्यासोबत आता नाहीस

सुखांचा पाऊस तू असताना बरसतोय
दुःखांचा पाऊस तू नसताना बरसतोय

तुझा मायेचा तो पदर
तेव्हा नव्हती तुझी कदर

तुझी ती मायेची सावली
आता कायमची हरवली

डोळे पाण्याने डबडबले तुझ्या आठवणीने
उर भरून आले तुझ्या आठवणीने

जीव भरकटतोय तुझ्याविना
जीव गुरफटतोय तुझ्याविना

आठवणीने कोंडलोय मी
आज तू नसल्याने गुदमरलोय मी

आसवांचा पूर आता वाहून जातोय
तुझ्या आठवणीने मी आता संपून जातोय.

✍️ स्वप्नील चंद्रकांत जांभळे
(ता. दापोली, हातीप, तेलवाडी)


विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

2 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular