श्रावण आला सणांना जणू बहरच आला,
पहिला सण नागपंचमीचा आला,
सासुरवाशिणींना माहेरची ओढ लावून गेला,
सूना सासर सोडून माहेरी पहिल्या सणाला निघाल्या,
मनात साठवून कैक आठवणी कन्या माहेरी येऊन विसवल्या,
आईच्या कुशीत मग पाणावल्या डोळ्यांनी हळूच शिरल्या,
माय लेकीच्या भेटीचा आनंद घेऊन आला,
श्रावण आला….
दुसरा सण रक्षाबंधनाचा आला,
भाऊ बहिणीच्या नात्याला जणू प्रेमाचा पुरच आला,
भावाच्या वाटेवर बहिणीची नजर खिळवून गेला,
बंधू राजाच्या आठवणीने बहिणीचा जीव व्याकूळ झाला,
भावाच्या येण्याने माहेरचा सारा गोतावळा डोळ्यासमोर तरळून गेला,
भावाला राखी बांधून बहिणीचा जीव आभाळा एवढा झाला…
श्रावण आला ….
तिसरा सण गोकुळअष्टमी आला ,
सखासोबती यांना एकत्रित घेऊन आला ,
प्रियकर प्रेयसीच्या प्रेमाला जणू उधाणच आला ,
यशोदेच्या आठवणीत कान्हा व्याकूळ झाला ,
माखन चोरांनी दहीहंडी फोडत आनंद साजरा केला . . .
श्रावण आला . . . . .
चौथा सण गणेश चतुर्थी आला ,
बाप्पाच्या आगमनासाठी मी पूर्ण घर माझ्या सजवला ,
मोदकांचा नैवेद्य्याचा आज मी खरा बेत केला ,
ढोल ताशेच्या गजरात बाप्पा माझा विराजमान झाला ,
आरतीच्या गजराने घर माझा पावन झाला . . . .
श्रावण आला …..
श्रावण आला …..
कवयित्री –
नेहा नितीन संखे ( बोईसर )
समन्वयक – पालघर जिल्हा
खुप सुंदर कविता
श
धन्यवाद सर🙏