भुकेल्यांची झोळी होती
अनाथांची वाली होती
नऊवारीतली माय ती
खूप साधीभोळी होती….
तिच्या वनवासापुढं फिकी
पडल गं रामाची सीता
भयान तुझी माई संघर्षगाथा….
चिमुरडं साडीच्या पदरात बांधून
जीनं मागीतली दारोदार भिक्षा
आपल्यांनीत दिली होती तीला
रक्तरंजीत शिक्षा…..
रक्षीण्या तिच गोमाता म्हणे धावली
किती वात्सल्य तुझं थोर माते
मुक्या जनावराला वाचा फोडलीस…
मी वनवासी लिहून मांडलास
जीवनाचा तूझ्या सारीपाट
आज अश्रूंचे वाहती पाट…
भूकेल्यांना दिले अन्न तू
तहानलेल्या जीवांना
पाजलेस पाणी….
करूणी गोरक्षा
गेलीस माय तू मोक्षा….
फुलांच्या पायघड्या
कधी नव्हत्या ठावूक
तिच्या पायांना…
रक्तरंजीत काटेच होते बोचणारे
त्या काट्यांना मानूनी पुष्प
हस्तगत केले तू जीवनाचे लक्ष……
पद्मश्रीच काय भारतरत्न सन्मानही
तिच्या संघर्षापुढे फिका पडला असता….
खरं सांगू माई तुझ्यासारखा
भयान संघर्ष कुणीच पेलला नसता…..
सदैव झगडत राहिलीस अनाथांसाठी
सोडली नाही कसलीही कसर
अमर राहिल तूझी संघर्षभरी कहानी
नाही पडणार तूझा कधी विसर…
अनाथांसाठी सेवाकार्यास आपणही
थोडा हातभार लावूया
आपल्या लाडक्या माईंना हीच
खरी श्रद्धांजली वाहूया…..
– सौ.भाग्यश्री आपेगांवकर
अनाथांची माय कै.पद्मश्री डॉ.सिंधूताई सपकाळ यांना लिंक मराठी टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली
मुख्यसंपादक