करूनी वंदन तिरंग्याशी,
जयगान स्वातंत्र्याचे गाऊ या.
अमृत महोत्सवी वर्षाशी,
प्रणिपात विनम्रभावे करू या.१
वेदीवरती स्वातंत्र्याच्या,
सर्वस्व अर्पिले हुतात्म्यांनी.
स्वातंत्र्यासाठी मायभूमीच्या,
इतिहास लिहिला रक्तानी.२
क्रांतीज्योत पेटविणारी,
पिढी होती भारावलेली.
ज्वलंत ऐशी क्रांतीविचारी,
अंगार मनामनात भिनलेली.३
अंधारलेल्या क्षितीजावरती,
नवतेजाचा प्रकाश झळकला.
कोट्यवधी भारतीयांसाठी,
स्वातंत्र्य रवी उदया आला.४
करूनी स्मरण स्वातंत्र्यवीरांचे,
आदरांजली तयांसी वाहू या.
स्वातंत्र्य दृढमूल करण्याचा ,
संकल्प आजला करू या.५
मतभेदाना विसरूनी आपण ,
प्राधांन्य देशहितासी देऊ या .
लोकशाहीचा संन्मान वाढवून,
जयहिंद विश्वामधूनी गर्जू या.६
अमृतमहोत्सव अपुला स्वातंत्र्याचा ,
अपुल्या भारतमातेच्या गौरवाचा .
सैनिकांच्या अतुलनीय शौर्यगाथेचा ,
छत्रपती शिवरायांच्या भगव्याचा.७
येता घाला देशावरती महासंकटांचा,
ऐक्याने प्रतिकार करू या.
गौरव वाढवूनी महाराष्ट्राचा,
बलाढ्य भारत घडवू या.८
कवी – श्री रेवाशंकर वाघ ठाणे
आपल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यादिनी माझे काव्यपुष्प भारतमातेच्या चरणी वाहून काव्यरसिकांस समर्पित करीत आहे.
मुख्यसंपादक
[…] अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा अमित गुरव […]