नवी दिल्ली : देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसचा आज वर्धापन दिन. परंतु ऐन वर्धापन दिनीच काँग्रेस खासदार राहुल गांधी इटलीला रवाना झाले. त्यामुळे त्यांचा सर्वात मोठा विरोधी भाजप पक्षाने या परदेश दौऱ्याची खिल्ली उडवली आहे.
राहुल गांधी यांच्या आजी आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी गांधी इटलीला गेल्याचं काँग्रेस नेते राजीव सातव यांनी सांगितलं . तसेच कधीतरी पंतप्रधान मोदींना पत्रकार परिषद घ्यायला सांगा, सगळेच प्रश्न राहुल गांधींना का असा सवालही त्यांनी विचारला .

मुख्यसंपादक