Homeआरोग्यआणि किन्नर कडून मला मिळाले…

आणि किन्नर कडून मला मिळाले…

        काही दिवसांपूर्वी कामानिमित्त मुंबईत जाणे झाले होते. रेल्वेमध्ये कोरोना मुळे फारशी गर्दी नसल्याने निवांत जागा मिळाली. काही वेळातच एक किन्नर तिथे आले. मी बसलेल्या डब्यात ते पैसे मागत होते आणि थोड्याच वेळात माझ्याजवळ येऊन पोहोचले. 
          मी ही खिशात हात घातला तर ५ रुपयांचे नाणे मिळाले;  तेच देत असताना मला आठवले की किन्नर लोकांनी जर त्यांच्याकडील १ रुपया दिला तर आपल्याला धनसंपत्ती मिळते. मी त्याच विचारात असताना त्यांनी टाळी वाजवली आणि माझी तंद्री मोडली.सहसा कोणालाही ते पैसे परत देत नाहीत असे ऐकून व वाचनात होते त्यामुळे मिळाले तर आनंद आणि नाही मिळाले तरी हरकत नाही असे समजून मी त्यांना विचारले एक रुपया दोगे क्या? तोच त्यांनी स्वखुशीने आशीर्वाद व एक रुपयाचे नाणे पण दिले . मी कोणाकडून तरी भीक मागितली आणि मला ती इच्छेप्रमाणे पूर्ण मिळाली या आनंदात असताना ते तेथून पाठमोरे झाले. ( मला पुन्हा त्यांच्याशी बोलायचे होते पण काय ? आणि कसे सुरवात करू  हे न समजताच ) 
                माझ्या सोबत असलेला तुकाराम हे सर्व पाहत होता . तू खूप नशीबवान आहेस . मी इतक्या लोकांना पाहतो यांना १००-५०० रुपये देण्यास तयार झाले तरी ते त्यांच्याजवळचे पैसे देत नाहीत पण तुला दिले हे जपून ठेव असे सांगत होता. 
                  माझे स्टेशन अजून बरेच लांब होते . कानातील हेडफोन काढला अन विचार येऊ लागले की मलाच का दिले असतील ? कारण मी तर फक्त ५ रुपये दिले होते. आणि पहिल्याच प्रयत्न करून यशस्वी कसा झालो ? 
              आज तोच प्रसंग मी पुन्हा-पुन्हा आठवला तेव्हा जाणवले की ते माझ्याजवळ पैसे मागायला येण्याआधी मनात प्रश्न उपस्थित होत होते ; लॉकडाऊन इतके दिवस / महिने होते अजूनही लोक रेल्वेतुन नियमाप्रमाणे मुक्त संचार करू शकत नव्हते. मग यांचा उदरनिर्वाह कसा होत असेल ? त्यांच्यापैकी कोणी कोरोनाचे बळी पडले असतील का? यांची कोणती युनियन किंवा संघटना असेल का? व आम्हाला मदत मिळावी म्हणून त्यांच्या कडून काही संघटनात्मक प्रयत्न झाले  असतील ? असे नानाविध यक्षप्रश्न मी पत्रकार असल्याने मला पडले असावेत. मी फक्त शुद्ध भावनेने त्यांचा विचार केला आणि माझी अपेक्षा त्यांच्यातील एका व्यक्तीने पूर्ण केली . 
             मला माहित नाही , त्या १ रुपया दिल्याने अजून धनसंपन्न होईन की नाही पण त्यांच्या आशीर्वादामुळे आशा अनेक संघटित-असंघटित लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे बळ यावे हीच अपेक्षा. 

पत्रकार – अमित गुरव

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular