Homeघडामोडीइस्लामपूर नगरपालिकेच्या मनमानी कारभारा विरोधात उपोषण

इस्लामपूर नगरपालिकेच्या मनमानी कारभारा विरोधात उपोषण

इस्लामपूर ( अहमद नबीलाल मुंडे )-
. इस्लामपूरच नगरपरिषद मनमानी आणि भोंगळ कारभाराचया विरोधात आज इस्लामपूर शहरवासीयांनी इस्लामपूर तहसिलदार कार्यालय येथे उपोषण चालू केले आहे
इस्लामपूर नगरपरिषदेकडून सन 2021 व 2022 सालाची चाजक मालमत्ता आकारणी चुकीची बिले देऊन नागरिकांची अन्यायकारक व चाजक वसुली केली जात आहे इस्लामपूर शहरातील नगरपालिका मालकीचे दुकान गाळे. शाॅपिंग सेंटर यांच्यावर अतिरिक्त वाढीव अनामत रक्कम व जाचक भाडेवाढ व सदर व्यवसायिकांना विश्वात न घेता घेतली जाणारी लिलाव प्रक्रिया अन्यायकारक आहे तरी ती प्रकिया करत असताना सदर गाळे धारक यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे बरेच दिवस इस्लामपूर शहरात चालू असणारे भुयारी गटार या कामाची गुणवत्ता दक्षता समिती पथक मार्फत चौकशी करण्यात यावी कामांचा कालावधी संपला तरी सुद्धा भुयारी गटार योजना पूर्ण झालेली नाही इस्लामपूर शहरातील तहसिलदार कार्यालय येथे असणारे छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असणारे वाहन पार्किंग वाहतुकीला अडथळा निर्माण करत असल्यामुळे त्वरित वाहन पार्किंग बंद करण्यात यावे इस्लामपूर शहरातील काही लोकांनी गटरवर अतिक्रमण करून बांधकाम केल्यामुळे गटर साफ करण्यास त्रास होत आहे त्यामुळे इस्लामपूर शहरात डेंग्यू. काविळ चिकन गुण्या या साथीच्या रोगाने थैमान घातले आहे त्यामुळे इस्लामपूर शहरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरि अतिक्रमण केलेल्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी इस्लामपूर शहरात मुख्य चौकात चौकात महिला व पुरुष यांचेसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात यावी इस्लामपूर शहरात झालेली रस्ता व गटर बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे तरि संबंधित ठेकेदार कंत्राटदार त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी
असे निवेदन इस्लामपूर नागरिक यांचे वतीने 26/12/2018. 28/7/2019 6/12/2019. वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे जनतेला न्याय मिळेपर्यंत उपोषण चालूच राहणार असे मत समाजसेवा गजानन पाटील यांनी मांडले आहे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular