ओवाळणी !!!!!

यावर्षी माहेरी जायला जमलं नाही म्हणुन..घरी आलेल्या भावाला..हॉलमध्ये पाट रांगोळी घालून नवऱ्यासमोरच औक्षण करुन तिनं त्याला ओवाळलं,तसा तो उठून उभा राहिला शर्टच्या खिशातून ओवाळणीचं पाकीट काढून हळूच तबकात ठेवत..खाली वाकून चरणस्पर्श करीत त्यानं बहिणीला नमस्कार केला,अरे असू दे!तू बस!मी फराळाचं आणते!म्हणत तिनं औक्षणाचं तबक उचललं,तसा तो घाईघाईत म्हणाला,ताई फराळाचं राहू दे!तेव्हढा वेळ नाहीये!कामावर जायला उशीर होईल!पुन्हा येईल मी!असं बोलून तो दारापर्यत गेला सुद्धा..अरे!थांब जाऊ नकोस तसा..थोडं फराळाचं देते!ते तर् घेऊन जा!आलेच मी…बहिणीनं त्याला थांबवलं होतं…..

बहिणीनं दिलेली फराळाची पिशवी घेऊन तो निघाला होता.. कांही अंतर गेल्यावर मोबाईलची रींग वाजली..त्यानं पाहिलं..ताईचा फोन होता..बहिणीचा फोन येईल याची जणू त्याला अपेक्षा केली असावी..रस्त्याच्या कडेला थांबून त्यानं..मोबाईल कानाला लावला…गळ्याशी दाटलेला हुंदका कसातरी थोपवत..बहिणीनं तिकडून कांही बोलायच्या आत कंठ दाटलेल्या आवाजात त्यानं बोलायला सुरवात केली…

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/

ताई!माफ कर मला!तुला ओवाळणी घालायला माझ्या जवळ पैसे नव्हते..तबकात ठेवलेल्या पाकिटात काहींचं नव्हतं!पुढचं बोलणं त्याला अवघड जातं होतं..मोबाईल कानाला लावून तो तसाच उभा होता…अरे वेड्या!पलिकडून गहिवरून आलेल्या बहिणीचे स्वर कानी येतं होते…. खिशातलं पाकीट काढतांना थरथरणारा तुझा हात!तुझ्या चेहऱ्यावर दिसणारे भाव!निघण्याची केलेली घाई पाहूनच!तू काहीतरी लपवतो आहेस वाटलंच होतं!आत जाऊन फक्त खात्री केली!अरे!आता अनलॉक झालं असलं तरी तुझा गेलेला जॉब अजुनही तुला मिळालेला नाहीये!माहिताय मला!कामावर जायला उशीर होईल!हा बहाणा सुद्धा ओळखला होता!तुझी बहीण आहे मी…

ताई तू समजुन घेतलंस!पण तिथं बाजुला भाऊजी बसलेले!त्यांच्या लक्षात आलं असतं तर?नोकरी अभावी फार बिकट परिस्थिती झालीय गं आमची!कामावर परत बोलावण्याची आशा मावळल्या सारखं झालंय!बायको मुलांसह संपवावं सगळं !असं वाटतं!नको असं जगणं…

http://linkmarathi.com/पेट्रोल-पंपावरील-आवश्यक/

शू!चूप बस्स!असं अभद्र बोलू नकोस!सगळं चांगलं होईल!असा धीर सोडू नकोस!अरे माझ्याकडे बघ!आम्ही सुद्धा कसबसं तोंड देतोय आल्या दिवसाला!नोकरी आहे पण अर्धाच पगार मिळतोय ह्यांना!तुला एक सांगू!भाऊबीजेला येण्याचं मुद्दाम टाळलं मी !उधार उसनवार करुन तुम्ही केलंही असतं माझं सगळं!नाही पटलं ते मनाला!ह्यांनी सुद्धा माझा निर्णय योग्य ठरवला!उलट आपल्याकडून होता होईल तितकी मदत करूया!असं ठरवलं ह्यांनी!तुला संकोच वाटेल म्हणुन तुझ्याशी नाही बोलले हे!आता सुद्धा फराळा बरोबर तुझ्या ओवाळणीच्या रिकाम्या पाकिटात थोडे पैसे ठेवलेत ते नीट सांभाळ!आणि असा खचून जाऊ नको रे!आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी!सगळे दिवस सारखेच नसतात!आणि हो!या भाऊबीजेची ओवाळणी म्हणुन एक वचन दे मला!इथून पुढं कुठलाही वाईट विचार आणणार नाहीस मनांत!शांतपणे घरी जा!तुझे भाऊजी नेहमी म्हणतात ना!तसं म्हणते मी…….be happy…….
be positive……..

http://linkmarathi.com/ग्राहकांना-मिळालेले-अधिक/

बहिणीचं बंधूप्रेम आणि भ्रमण ध्वनीच्या सूक्ष्म लहरींनी खूप चांगलं काम केलं होतं आज..खचलेल्या एका भावाला नव्यानं उभारी देण्याचं..

http://linkmarathi.com/सौभाग्यालंकार-जोडवी-का-घ/
  • राजेश घोडके ( गडहिंग्लज )
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular