Homeमुक्त- व्यासपीठऔषध ( Medicine ) मिळते काय ?

औषध ( Medicine ) मिळते काय ?

तालुक्याच्या ठिकाणी एक नामवंत मिडीकल होते तशी सदा-सर्वादाच गर्दी असायचीच पण आज सकाळपासून गर्दी हटण्याचे नाव न्हवते . मालक ( सुतार ) आणि मेडिकल मध्ये काम करणारे २ युवक औषध ( Medicine ) देत ग्राहकांना एक- एक करून मोकळं करत होते . त्यांची हे जिकरीचे काम चालू होते.

http://linkmarathi.com/क्रिमरोल/


एक वृद्ध महिला मात्र बराच वेळ त्या मिडीकलच्या बाजूला असलेल्या झाडाचा आधार घेत उन्हापासून स्वतःचा बचाव करीत होती. मालकांचे तिच्याकडे लक्ष वेधले व कोणती औषध हवी आहेत मावशी म्हणून हाक दिली पण ती काही न बोलता गप्प उभीच होती तितक्यात दुसऱ्या ग्राहकाने आपली चिठ्ठी हातात ठेवत मला घाईत जायचे आहे असे सांगितले , एकामागोमाग दुसऱ्यांनी चिट्ठी देत आपण खूप घाईत आहोत हे अप्रत्यक्षपणे दाखवले याला तर आता बराच वेळ निघून गेला होता. गर्दी थोडी विरळ होत होती पण संपत मात्र नव्हती.
सुतार (मालकांनी ) मिडीकल मध्ये असणाऱ्या त्या युवकांना इशारा दिला आणि स्वतः बाहेर पडले. त्या वृद्ध स्त्री जवळ जाऊन मावशी कोणती औषध हवी आहेत ? आणि पैसे कमी आहेत म्हणून मिडीकल बाहेर इतका उशीर उभ्या आहात का? असे प्रश्न केले. त्यावर पैसे तर आहेत लेकरा पण मला मला जे औषध हवे आहे ते तुझ्याकडे आहे का ? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. त्यांनी औषधांची चिट्ठी मागितली पण मावशी ने चिट्ठी नसल्याचे सांगितले. आणि म्हणाली लेकरा मुलगा साधारण तुझ्याच वयाचा असेल त्याला शिकवून सवरून मोठे केले तो आता मोठ्या कंपनीत जवाबदरीच्या मोठ्या पदावर लाखो रुपये पगार घेतो म्हण … दरवर्षी सुट्टीच्या काळात बायका मुलांना घेऊन भेटायला घरी येत असे पण सध्या मोबाईल वर यावेळी मी का येऊ शकत नाही या कारणांची फक्त लिस्ट पाठवतो. आता दिवाळी जवळ येत आहे त्याची आस लागून राहते तेव्हा असे एकादे औषध असेल तर दे ज्यामुळे मी मला मूल आहे हेच विसरून जाईन .. आहे का तुझ्याकडे असे औषध..?

http://linkmarathi.com/पेट्रोल-पंपावरील-आवश्यक/


सुतार मालक तर निशब्द झाले होते त्यांच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहु लागले. अश्या औषधांची आज समाजात खूपच गरज निर्माण होत आहे पण असे औषध कोण बनवणार ह्या विचारात ते हरवले. पण त्याने असे औषध आले की तुम्हाला लगेच कळवतो असे बोलत त्याचा पत्ता व मोबाईल क्रमांक घेऊन रिक्षात बसवले.
बरेच दिवस ते त्या वृद्ध स्त्रीचा विचार करत होते ; एके एके दिवशी आपल्या बायको आणि मुलासह स्वतःच्या मुलांची आस लागलेल्या त्या वृद्ध मावशीच्या घरी गेले ; क्षणभर मावशी ही गोंधळून गेली , तेव्हा तो म्हणाला माझे शिक्षण खडतर परिस्थितीत असतानाही आईवडिलांनी केले पण सुखाचे दिवस येणार त्या आधीच त्यांना देवाज्ञा झाली . याकारणाने त्यांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला मिळालेच नाही. म्हणून आम्ही दिवाळी तुमच्यासोबत साजरी करण्याचे ठरवले आहे. मावशीचे डोळे आनंदाश्रू नी डबडबले व आलेल्या सुनेसह नातवंडांची गळाभेट घेत शुभाशीर्वाद दिले.
या सुतार मालकांनी जे औषध मावशींना दिले तेच जर इतर वृद्ध आई वडिलांना देता येईल का ? आणि या पद्धतीने एका व्यक्तीने जरी असे केले तरी हा लेख सार्थकी आला असे नक्कीच म्हणता येईल.

http://linkmarathi.com/सप्तशृंगी-गड-वणी/


ही संकल्पना तुम्हाला आवडली असल्यास आपल्या इतर मित्र- मैत्रिणीसोबत नक्कीच share करा.

  • अमित गुरव (आजरा , कोल्हापूर )
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular