Homeमनोरंजनह्या मजेदार नोकऱ्या तुम्हाला मिळाल्या तर…

ह्या मजेदार नोकऱ्या तुम्हाला मिळाल्या तर…

आज काल नोकरी मिळवण्यासाठी इतकी झुंबड आहे की खूप उच्चशिक्षित लोक ही नोकरी मिळवण्यासाठी रांगेत उभ्या असतात. आपण ते अनेकदा पाहतो काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात तर काही लोक त्यांना टोमणे मारतात आणि आपला व्यवसाय सांभाळतात. नोकरी म्हटली की बॉस चा तो चेहरा आठवतो आणि तो आपली पिळवणूक करणार याची आपल्याला खात्रीच असते. पण जगात अश्याही काही नोकऱ्या आहेत ज्यामध्ये कंटाळा तर येणार नाहीच पण त्याकरण्यासाठी तुम्हाला गंमत येईल त्यामुळे ती नोकरी तुम्ही सोडूच शकणार नाही हे नक्की..

तर जाणून घेऊ काय आहेत त्या मजेशीर नोकऱ्या ?

http://linkmarathi.com/जागतिक-पुरुष-दिन/

१) भाड्याचा बॉयफ्रेंड -: जपान मध्ये मुलीकडे बॉयफ्रेड नसेल तर तिला भाड्याने बॉयफ्रेड मिळतो . अश्या मुलींना त्या मुलीसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे असतात. आणि याचे त्यांना ठरावीक पैसे ही मिळतात मग अशी नोकरी मिळाली तर कोणाला आवडणार नाही ? विशेष म्हणजे पुणे मुंबई येथे सुद्धा बॉयफ्रेड उधारीवर मिळेल असे अँप चालू होते पण सद्या त्याबाबत काही वाचायला मिळत नाही.

२) झोपण्याची नोकरी – खूप जास्त झोपत असेल तर त्याला आम्ही तुम्ही कुंभकर्ण म्हणत असू किंवा म्हणताना ऐकले असेल. पण झोपण्यासाठी पैसे मिळतात आणि ते पैसे मानवी मेंदूचा अभ्यास करण्यासाठी संशोधन करणारे शास्त्रज्ञ पैसे देतात . व त्यांचा अभ्यास केला जातो.

३) लग्नात पाहुणे – आपण कधी कोणत्या लग्नात बिनबोलवता गेला आहात का ? कारण तिथे जेवण चांगले आहे म्हणून …
किंवा असे जायचे होते पण लाज वाटते किंवा बोलवले नाही म्हणून गेलो नाही असे कधी झाले आहे का ? पण लग्नात पाहुणे म्हणून येण्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसे मिळतात. सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा च्या शुद्ध देसी रोमांसमध्ये तुम्ही पहिलेच असेल.

४) लोकांना रेल्वेत ढकलणे -: भारतीय लोकांना तसे ही रेल्वेत बाकावर बसण्यापेक्षा दरवाज्याजवळ लटकायला फार आवडते असे अनेकदा पाहण्यातून समजते , त्याला गर्दी हे सुद्धा कारण आहेच म्हणा…
पण हीच गर्दीची समस्या जपान मधील लोकांना ही आहे . अश्या लोकांना रेल्वेत ढकळण्यासाठी युनिफॉर्मधारक लिम नेमलेले असतात. .

५) रांगेत उभे राहणे-: रांगेत उभे राहणे किंवा प्रतीक्षा करणे ही जवळजवळ सर्वच लोकांना त्रासदायक वाटतं. पण अश्या कामाला पैसे मिळत असतील तर … ज्या लोकांना अश्या लाईन मध्ये उभे राहणे म्हणजे आपला वेळ वाया घालवणे असे वाटते ते लोक लोकांना लाईन मध्ये उभे राहण्याचे पैसे देतात.

६) परफ्युम टेस्टर – तुझं नाक अगदी कुत्रासारखं तीक्ष्ण आहे असे आपण अनेकदा लोकांना उपहासात्मकतेणे म्हणतो ; पण ज्यांचं नाक तीक्ष्ण असते आणि परफ्यूम ची जाण त्यांना या नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. नाही त्यातून पैसे ही मिळवता येतील.

७) विजेचा झटका देणे -: बसला ना झटका ? पण हे खरे आहे मेक्सिको या देशात चौकात विजेचा झटका देणारे लोक उभे असतात. जास्त दारू पिलेल्या लोकांना विजेचा नॉर्मल झटका देऊन त्यांना ठिकाणावर आणले जाते.

८) आलींगण देणे- आज ह्याची सर्वात जास्त गरज आहे कारण लोक एकाकी आहेत . त्यांना कोणाच्यातरी आधाराची गरज असते. त्यामुळे ते लोक आलींगण देण्याचे सुद्धा पैसे देतात. परदेशात तर असे अनेक प्रोपेशनल आलिंगन देणारे लोक आहेत .

http://linkmarathi.com/मी-वेश्या-आहे-म्हणून-समाज/

९) पाण्याची घसरगुंडी ची चाचणी करणे-: घसरगुंडी खेळली नाही असा व्यक्ती महाराष्ट्र राज्यात सापडणे तसे विरळच.. अनेकदा मोठ्यामोठ्या लोकांनाही घसरगुंडी दिसली की कंट्रोल होत नाही पण काही मर्यादेमुळे ते थांबतात..
घसरगुंडी तुन घसरत येऊन पाण्यात जाण्यासाठी अनेक लोक ठराविक ठिकाणी पैसे खर्च करून जातात पण घसरगुंडी खेळण्यातून यात किती मजा येते ही चाचणी ( टेस्ट ) करण्याचे ही लोकांना पैसे मिळतात.

१०) शोक व्यक्त करणारे-: मृत्यू झाला की शोभसभा होते . जवळच्या नातलगांना धीर दिला जातो . पण चीनमध्ये अश्या अनेक ठिकाणी इतर संकटे आली की तिथे जाऊन शोक व्यक्त करतात. अशी प्रथा राजस्थान मध्ये ही आहे . अश्या रडणाऱ्या रुदाली पैसे घेऊन शोक व्यक्त करतात.

११) सायकल पाण्यातून काढणे-: मस्टरडँम येथे एम्सटल नदीतून जवळजवळ १५ हजार सायकली दरवर्षी काढल्या जातात . यासाठी लोकांना पगार ही दिला जातो.

१२) सिरीज पाहण्यासाठी -: अनेक लोकांना सिरीज पाहण्याचे प्रचंड वेड असते . बसल्या जागी ते पूर्ण सिरीज पाहू शकतात हे आपण आपल्या काही जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत कदाचित अनुभवलेले असेल. जगात असे लाखो लोक पैसे देऊन पाहणारे आहेत. पण नेटफ्लिक्स अनेक लोकांना आपल्या कंटेंट बघून त्यावर प्रतिक्रिया लिहण्यासाठी पैसे देतात.

http://linkmarathi.com/क्रिमरोल/

१३) बिअर वाइन टेस्टर- मद्य पिणाऱ्याची संख्या किती आहेत हे तर आपण जाणतोच. त्यासाठी लोक खूप पैसेही खर्च करतात..
पण हे पेय पिण्याचे पैसे मिळतात असे सांगितले तर अश्या कित्येक लोकांची त्या जॉब साठी झुंबड उडेल हे नक्की. बिअर वाइन पिऊन त्याच्या रेसिपीज बद्दल मत व्यक्त करण्यासाठी वार्षिक पॅकेज दिले जाते .

तर मग कश्या वाटल्या ह्या नोकऱ्या ? आवडल्या असतील तर आपल्या मित्रांसोबत नक्कीच share करा…

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/

संकलन -: लिंक मराठी टीम

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular