Homeघडामोडीकाय रे दादा , आजऱ्यात इंग्रजांनी बांधलेला पूल शतक झाले तरी Ok...

काय रे दादा , आजऱ्यात इंग्रजांनी बांधलेला पूल शतक झाले तरी Ok पण रस्ता ..?

आजरा ( अमित गुरव )-: रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी सकाळी अंजना ( काल्पनिक नाव ) दादाच्या ओढीने आपल्या नवरदेवासह आजरा तालुक्यातील तिच्या घरी बर्याच दिवसांनी येत होती. मुले आजी आजोबा , मामा मामी भेटणार म्हणून खुश पण …
आजऱ्यात येण्याची चाहूल त्यांना खड्यात गेलेला रस्ता पाहून आली. नवरदेव बिचारे एक खड्डा चुकवण्याच्या नादात दुसऱ्या खड्ड्यात गाडी घालून मुलांच्या समोर हाती सत्ता असणाऱ्या सरकारच्या आणि अज्ञात कंत्राटदाराच्या उद्धार करू शकत नसल्याची सल अंजना ला स्पष्ट जाणवत होती. आणि अचानक पणे एका खड्यात जोरात गाडी आपडली आणि तिच्या तोंटातून अपशब्द निघालेच… मुलांनी शब्दांचा अर्थ विचारण्याचा प्रयत्न केला पण आईचा रुद्रावतार पाहून शांत राहणेच पसंत केले..
घरी सरप्राईज द्यायचे म्हणून आलेल्या अंजनाला रुद्राव्यस्थेत आणि वैतागलेल्या अवस्थेत पाहून तिचे आई वडील ही समजावून सांगून थकले . भाऊ येताच तिने तू मोठा नेता म्हणून गावातून फिरतोस तुझ्या नेत्यांना सांगून तेवढे रस्ताच बघ की ? काय 2-4 लोकांच्या मरनानंतरच सरकार जागे होणार असा प्रश्न उपस्थित केला.


इंग्रजांना आपण नावे ठेवतो पण त्यांनी बांधलेला 100 वर्षांपूर्वीचा पूल अजूनही ok आहे पण तुम्ही निवडून दिलेल्या सरकार चा रस्ताचे वर्षात वर्षश्राद्ध घालतो असे का ? मला भाऊबीज म्हणून आजऱ्यात एक चांगले सरकार आणण्यासाठी प्रयत्न कर जे रस्ता , आरोग्य , शिक्षण , रोजगार , अश्या सामाजिक विषयावर कार्य करतील . त्यानंतरच रामतीर्थ , चित्री चे Status लावून सर्वाना आमंत्रित करा असे प्रेमळ सल्ला देत राखी बांधली . अश्या अंजना आज आजरा महामार्गावर खूप दिसत होत्या ज्यांना अगोदरच मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने ( नैसर्गिक आपत्ती ) ने बेजार केले होते आणि त्यात ह्या खड्यात गेलेल्या रस्त्याची भर …
शेवटी हा प्रश्न उरतोच की हे भाऊ बहिणीची ही मागणी पूर्ण करू शकतील की माझा हा नेता , जातपात , लोभणीय आमिषे , यावरच मतदान करतील ?
तुमच्या प्रतिक्रियेतून व्यक्त होऊ शकता..

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular