वर्ष म्हणजे तरी काय हो
तिनशे पासष्ट दिवसांची
दिवस रात्र, हप्ते महीने,
मिळून बनलेली कॅलेंडर
ची बारा पाने
घडीच्या काट्यांनी सरकणारी वेळ
उदय ते अस्ता प्रयंतचा रोजचा प्रवास
त्यात काय वेगळं. हे चक्र तर रोजचंच
जानेवारी म्हटले की हुडहुडी
भरवणारी थंडी
एप्रिल म्हणजे घामाच्या धारा वाहणारा उन्हाचा चटका
अन् आॅगष्ट श्रावण धारांची रिमझिम
हे सगळं अन् बरच काही
कॅलेंडर च्या बारा पानांची खरी किमया
महिन्याचा पगार, हप्त्याचा बाजार
ठरवून केलेल्या रकाण्याचां
वेगवेगळा आकृतीबंध, कधी जूळतो कधी पळतो तर कधी आपणच त्याला टाळतो.आपल्याच सोईसाठी…
उद्या कॅलेंडर बदलणार आहे
वेगळं काय त्यात. घाण्याच्या बैलाला विसाव्याची
असंख्य कारणे. बेरंगी आयुष्यात
रंगीबेरंगी चमचमणारे पट्टे.
त्या पट्यावर आले की आयुष्याच्या
घालमेलीत सगळंच विसरुन आपल्याच
तंद्रीत काही क्षण टीपत.
थांबवत, पळवत, दौडवत, निद्रा ते जागेपण
हा सगळा त्या कॅलेंडरचा रंगमंच
मागच्या कॅलेंडरच्या बारा पानांत खूप
सोसलं, खूप भोगलं, बरच
मिळवलं बरंच पळवल.
काही जपावे असे क्षण, काहींचा
कायमचा व्हावा स्मृतीभ्रंश.
जे भिंतीवर लटकणार आहे
नव्याने त्यात ठरवलेले आडाखे
नव्या नव्या योजना त्याचे रंगीबेरंगी
रकाने अधीकच गडद झालेत.
सापशिडी च्या खेळा सारखे
नाचवनार आहे ते मला तुम्हाला आपल्या सगळ्यांना त्यांच्याच तालावर वरून
खाली अन् खालून वर….
काय फरक पडणार आहे म्हणत
आज मी एक नव कॅलेंडर आणलं
जुनं काढून त्याजागी लावण्यासाठी….
जगन्नाथ काकडे
मेसखेडा
Happy_new_year_2023
मुख्यसंपादक