Homeवैशिष्ट्येकोजागिरी पौर्णिमा विशेष

कोजागिरी पौर्णिमा विशेष

प्रथम सर्वांना माझ्या कडून व लिंक मराठी कडून आपणा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…..

बाळ जन्माला आल्या आल्या चंद्र हा सर्वांचा मामा बनतो.
अन् झोपताना चा अंगाई ही गातो. हा सर्वांचा लाडका म्हणायला हरकत नाही. प्रत्येकाच्या रुपात तो वेगवेगळ्या भाव भावनासह व्यक्त होत असतो.

संगीतामध्ये अगदी प्रसिद्ध असा चंद्र आज खूप सुंदर दिसतो.

रफी सरांपासून ते आता च्या गायका पर्यंत खूप सुंदर सुंदर गाणे ऐकायला भेटतात.
हे गाणे तर तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल……

मैंने पूछा चाँद से कि देखा है कहीं मेरे यार सा हसीं?
चाँद ने कहा, “चाँदनी की क़सम, नहीं, नहीं, नहीं”

बर हे झाले एक सुंदर गीत.
पौराणिक मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेला समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी प्रकट झाली होती. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा हा सण देवी लक्ष्मीजा जन्मोत्सव म्हणून ही साजरा केला जातो. या दिवशी रात्री जागरण करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. असे केल्यास आयुष्यात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही अशी ही मान्यता आहे.

आज कोजागिरी पौर्णिमा म्हणजे आज घरोघरी मसाला दूध बनवलं जात. मसाला दुधाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा देखील म्हटलं जातं. महाराष्ट्रासह अनेक राज्यात मोठ्या भक्तीभावाने कोजागिरी पौर्णिमा साजरा करण्यात येते.कोजागिरी पौर्णिमेला मध्यरात्री पूजा केल्याने देवी लक्ष्मीची प्रसन्न होते आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करते असे मानले जाते.

कोजागरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते.

कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

या दिवशी व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. पूजन व जागरण यांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात.

काही ठिकाणी या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडावेत. घरे सुशोभित करावीत. दिवसा उपवास करावा. गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा.

विविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा पूजा- अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते.

पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा केली होती. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात.यावेळी श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते.

या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची ‘आश्विनी’ साजरी करतात.
अश्यावेळी कोजागरी पौर्णिमेच्या चांदण्यात आग्रा येथील ताजमहाल पाहण्याची खास संधी पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठी विशेष दरही आकारला जातो.

कोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून ‘शरद पुनम’ नावाने साजरी केली जाते.
मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा ही पूजा केली जाते.

या निमित्ताने नव्याने लग्न झालेल्या मुलीच्या घरून तिच्या सासरी जावयासाठी भेटवस्तू पाठविण्याची विशेष पद्धत प्रचलित आहे.

हिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते.
राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात. धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात.
तर
हरियाणामध्ये आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात.

ओडिशामध्ये, शरद पौर्णिमेला ‘कुमार पौर्णिमा’ असे म्हणतात.या दिवशी गजलक्ष्मी देवीची पूजा करतात.
या दिवशी देवीच्या जोडीने चंद्र आणि सूर्य यांचीही पूजा केली जाते.
कोजागरी पौर्णिमेला बंगाली लोक ‘लोख्खी पुजो’ असे ही म्हणतात. या दिवशीच्या लोख्खी पूजेमध्ये बंगाली लोक शहाळी वा ताजे नारळ वापरतात. नारळात साखर, दूध, तूप आणि सुकामेवा घालून केलेला विशेष गोड पदार्थ या दिवशी कमळात बसलेल्या लक्ष्मीला अर्पण केला जातो.
तांब्याचा कलश किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळ्यावर शेंदराने बंगाली हिंदु स्वस्तिक चिन्ह मधल्या बोटाने आणि ओल्या लाल शेंदुराने काढतात या दिवशी शंख व कमळाच्या फुलाबरोबर श्रीलक्ष्मीनारायणाची पूजा करतात.

दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांच्यावरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे ही मानले जाते.

कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.

निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे.या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.

या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात.
घरासमोर लावलेल्या हरतऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते.

यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात.
मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात. नवी म्हणजे आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी, तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी.

अश्या विविध पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेला आज महत्व प्राप्त होते.

धन्यवाद….
रुपाली शिंदे
आजरा

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular