Homeवैशिष्ट्येकोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा

दिन आश्विन शुद्ध पौर्णिमेचा ,
माणिकेधारी कोजागिरीचा.१

येई वसुंधरेच्या अधिक जवळ चंद्र,
प्रकाशमान होई १६ कलेने चंद्र.२

जंन्मदिन माता लक्ष्मीचा कोजागिरीचा,
रासलीलेचा सोहळा वृंदावनी कन्हैयाचा.३

केशरी दूध आटवूनी चंद्र प्रकाशात ,
निघे न्हाऊनी धरती शुभ्र चांदण्यात.४

पूजतसे‌ बळीराजा नवीन धांन्यास ,
नवीन तांदळाची खीर असे जेवणास.५

हेाजागरी नृत्य करीती आदिवासी बांधव,
होलोमा आणि मायलोमा पूजीताती देव‌.६

शीतल वारा ,शुभ्र चांदणे ,सुवास पुष्पांचा ,
मधूर दूधासंगे वाढवी आनंद कोजागिरीचा.७

कवी श्री रेवाशंकर वाघ‌ ठाणे .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular