Homeघडामोडीकोल्हापुर धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेसाठी चुरशीने शांततेत..85.% मतदान.

कोल्हापुर धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेसाठी चुरशीने शांततेत..85.% मतदान.

 कोल्हापूर:- छत्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून लक्ष्मीच्या रूपाने नावारूपाला आलेल्या बाजारपेठेला लक्ष्मीपुरी धान्य व्यापारीपेठ म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर धान्य व्यापारी बालकल्याण संस्था म्हणजे येथील धान्य व्यापारी पेठेतील व्यापारी सभासदांची शिखर संस्था. याच संस्थेचा त्रैवार्षिक निवडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला.
    शंभरी पूर्ण केलेल्या हजारो विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी शैक्षणिक साहित्य , गणवेश वाटप करून गोरगरीब विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मनामध्ये शिक्षणाची ओढ निर्माण करणाऱ्या , लक्ष्मीपुरी येथील धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेचा निवडणूक कार्यक्रम चालू झाल्यामुळे. गेले आठ दिवस बाजारपेठेत निवडणुकीचे वारे वाहू लागले होते संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक प्रक्रिया शासकीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आधिपत्याखाली होत असल्याने सर्व व्यापारी वर्गाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते                                                                                      
   संस्थेच्या निवडून द्यायच्या 11 जागेसाठी दोन्ही पॅनलचे मिळून 22 उमेदवार निवडणूक रिंगणात होते श्री विवेक शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली महालक्ष्मी पॅनेलने ही निवडणूक *नारळ* या चिन्हावर तर....... श्री नयन प्रसाद यांनी छत्रपती राजाराम पॅनेलच्या नावाने *कबशी* या चिन्हावर ही निवडणूक लढवली.

आज सकाळी 8 वाजले पासून मतदानास सुरवात झाली. सकाळी. 11 वाजेपर्यंत 100. मतदारांनी. मतदानाचा हक्क बजावला.शेवटच्या 1 तासामध्ये. 44 मतदारांनी मतदान केले 169 मतदारापैकी मयत.10.वगळता. 144 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
दुपारी 12 वाजता बालकल्याण संस्थेच्या निवडणुकीतील एकूण 22 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. शासकीय निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मा. आसिफ शेख संस्था सचिव रमेश पाटील काम पाहीले
सर्व मतदार सुशिक्षित व सुज्ञ असल्याने दोन्ही पॅनेलच्या प्रमुखांसह उमेदवारांनी भेटीगाठी वर जोर दिलेला दिसून येत होता. दोन्ही पॅनेलकडून विजयाचा दावा सांगितला जात असला तरी चुरशीने व शांततेने पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत मतदारराजा कुणाचे बाजूनी कौल देणार हे दुपारी 1 नंतर समजेल.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular