बाप सांगायचा मला
नोटेवर गांधी दोन ठिकाणी असतो.
एक डोळ्याला स्पष्ट दिसतो
आणि दुसरा नोट उजेडाकडे केली
की, अंधुकसा दिसतो..
बाळा, अंधुकसा गांधी दिसला कि समजायचं
नोट खरी आहे म्हणून..
तुम्ही नेमके डाव्या बाजूला खरे
की तुम्ही उजव्या बाजूचे सत्य
फार मोठा गोंधळ आहे बापू
दोन्ही बाजूचे तुमच्यावर चिडतात
म्हणून तुमच्यावर लिहायचं धाडस ही होत नाही
नथुराम ने याच गांधीला
गोळ्या झाडून मारलं हे एक सत्य
नोटेवर नाही दिसलं कुठंच
गांधीला मारलं एवढं मात्र माहितीय मला
परवा कवितेच्या वर्गात
कवितेनेच एक प्रश्न विचारला मला
गांधी आणि नथुराम एकाच नोटेवर
छापले तर तू काय करशील?
मी चिडलो आणि म्हणालो
मी आग लावून टाकीन
छापणाऱ्यांना कापून टाकीन
दंगली करीन
हिंसा करीन
त्यावर कविता खळखळून हसत म्हणाली
बस खाली
तुला अजून गांधी कळलाच नाही..
- नितीन चंदनशिवे ( दंगलकार )
कवठेमहांकाळ सांगली.
मुख्यसंपादक
[…] गांधी कळला नाही […]
[…] गांधी कळला नाही […]
[…] गांधी कळला नाही […]