गारगोटी ( अंबादास देसाई ) -:
म्हसवे येथील सूरज बाळासो जाधव यांची जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स (इंडियन आर्मी) मध्ये टेक्निशियन पोस्ट साठी निवड झाली,याबद्दल सर्वप्रथम तुझे खूप खूप अभिनंदन.
परिस्थितीची जाणीव असणारी आणि परिस्थिती बदलण्यासाठी अतोनात कष्ट करण्याची धमक असणारे लोकच यशाची शिखरे पार करतात,त्यासाठी लागणारे कष्ट करण्याची तयारी असावी लागते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सूरज जाधव.घरची परिस्थिती बेताची, आई रोज शेतात मोलमजुरी करणारी,वडील रोज पडेल ते काम करत मुलांना सांभाळणारे,अगदी वर्षभर सुद्धा धान्य पुरणार नाही इतकी कमी शेतजमीन. फक्त आणि फक्त कष्ट करून घर चालवणारे आईवडील.हे सगळं बदलायचं असेल तर शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करायची आणि आईवडिलांचे पांग फेडायचे अशी जिद्द मनात घेऊन सूरजची वाटचाल सुरू होती.गावात दहावी पर्यंत शिक्षण घेऊन,गारगोटी येथे महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि लवकर नोकरी मिळावी आणि कुटुंबाला हातभार लावावा म्हणून (आय टी आय)केला.त्यांनतर कागल येथे किर्लोस्कर कम्पणीत नोकरी मिळाली आणि आईवडिलांना खूप मोठा आर्थिक आधार मिळाला.पण यावर सूरज समाधानी न्हवता.त्याचे ध्येय ठरलेले होते.नोकरी करत व्यायाम आणि अभ्यास सुरूच होता.ध्येय गाठण्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी त्याने सुरूच केली।होती.कोणत्याही क्षेत्रात तुम्ही प्रामाणिक काम करत असाल तर यश नक्कीच मिळते .अखेर सुरजच्या कष्टाला यश आले आणि त्याला इंडियन आर्मी मध्ये नोकरी मिळाली.कुटुंबातील लोकांना आनंद झाला. आयुष्यभर कष्ट करून मुलाला शिक्षण दिल्याचे समाधान आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.सूरज तू परिस्थितीवर मात करून मिळवलेले धवल यश हे आम्हा सर्वांना कौतुकास्पद आहे.तुझ्या या यशाने अनेक तरुण मुलांना नक्कीच प्रेरणा मिळेल अशी माझी खात्री आहे.
पुन्हा एकदा तुझे अभिनंदन आणि शुभेच्छा,
मुख्यसंपादक