नवं नवी टेक्नॉलॉजी आली आणि तरुणाईला त्यांनी भुरळ घातली. आज दिवसाला अनेक सोशल मीडिया प्लँटफॉर्म तयार होत आहेत. आणि तो प्लॅटफॉर्म आपल्याकडे नसेल तर आपण खूप मागे पडू त्यामुळे अपडेट राहण्यासाठी प्रत्येक अँप आपल्या मोबाईल मध्ये हवाच असा अट्टाहास धरून त्या मोहाचे शिकार होताना कित्येकदा पाहिले किंवा बोलले जाते.
फेसबुक आणि व्हाट्सअप्प वर ४ like मिळवण्याच्या नादात गुंग होऊन स्टंट करणारे तरुण- तरुणी आपल्याच परिसरातील कित्येक दिसून येतात. त्यामुळे आपला जीव धोक्यात येऊ शकतो , आई-वडिलांची मान खाली जाऊ शकते याचे भान विसरून तरुणाई या मोहाला बळी पडत आहे.
सध्या तर माझ्या गावात माझीच हवा हे उद्दिष्ट ठेवून कित्येकांची गुन्हेगारी प्रवृत्तीची स्टेटस फक्त दशहत / हवा करण्यासाठी असतात. त्यांच्या पारदर्शी आरशयासम मित्र त्यांना गावात तुझीच हवा पण जग लई मोठं आहे भावा असे सांगताना आढळत नाही /किंवा सांगितलेच कोणी तर तुलाच अक्कल नाही असे ठरवून पुन्हा त्याच धुंदीत वावरताना दिसतात.
या सर्वाचा परिणाम म्हणून वाण नाही पण गुण आला या उक्तीप्रमाणे त्यांना आयडॉल मानणारे त्यांच्या पाऊला वर पाऊल टाकत आपला रस्ता भरकटत आहेत. मागील वर्षी स्टेस्ट्स वॉर चा परिणाम म्हणून एका मोठ्या शहरात गोळीबार झाला आणि तरुणाला जीव गमवावा लागला होता. त्यांचे प्रस्थ आता इतके वाढले आहे की ह्या घटना ह्या नित्यनियमाने छोट्या-मोठ्या गावात देखील घडल्या / घडत आहेत. उदा. मागच्या काही दिवसांपूर्वीच एक स्वयं घोषित कोयता भाई खूपच व्हायरल झाला होता. गुन्हेगारी प्रवृत्तीची काही लोक आपली ताकत दाखवण्यासाठी अप्रत्यक्षपणे अश्या वाट चुकलेल्या तरुणाई ला हाताशी धरून आपले इच्छित ध्येय गाठत आहेत. यात आई- वडिलांनी ज्याप्रथम प्रसंगी सूनवायला हवे होते ते काम न केल्याने आता केस माझ्या हाताबाहेर गेली म्हणून मूग गिळून गप्प बसले आहेत.
यांना आवर आता फक्त पोलीस प्रशासनच घालू शकते. त्यामुळे सोशल मीडियावर भडकवणारे , तेठ निर्माण करणारे किंवा स्वयं घोषित दादा असणाऱ्यांच्या वर विशेष लक्ष देऊन त्यांना वेळीच सुधारावे ; त्यामुळे ते कितपत सुधारतील याची कल्पना नसली तरी त्यांना आयडॉल मानणारे तरुण / तरुणी तरी वेळीच सावध होतील अशी आशा करूया.
सर्व भार पोलीस प्रशासनाच्या माथी न मारता गावपातळीवर पोलिस पाटील आणि पोलीस मित्र बनून सुज्ञ लोकांनी मिळून प्रशासनाला मदत करूया.
- अमित गुरव
मुख्यसंपादक
अनिकेत राजेंद्र शिंदे
मुकाम – जाधेवाडी, पोस्ट – मासेवाडी
तालुका – आजरा, जिल्हा – कोल्हापूर