Homeवैशिष्ट्येएक होती चिमणी ...

एक होती चिमणी …

राॅकेलचा दिवा



काय मज्जा असायची … शेजारच्या काकू कडून
चमीनीभर रॉकेल मागुन आणायचो चिमणित
टाकायचो , एखादे मळके कापड फाडून तिची चिंदीची   वात बनवून
चिमणी लावायची आणि ती देवळीत ठेवायची
देवळीत ठेवली की साऱ्या घरात त्याचा उजिड
पडायचा हो , आणि सकाळी उठलो की चिमणीची काजळी वाकळ रगेवर पडायची
सगळी कपडे काळी पडायची ,
जेव्हा चिमणी लावली आणि त्याची वात
हिकडे तिकडे फिरायची न तेव्हा असं वाटायचं
की भिंतीवर एखादा नाग डोलतो की काय
ते पाहून भरपूर भीती वाटायची ,,
चिमणी खाली अभ्यास  करताना कधी कधी डोक्यावर वची केस हळूच भूरभूर जळायची व त्याचा वास यायचा लाजून दूसर्या दिवशी शाळेत जायला मग टाळायचो …चिमणी.जवळ  हमखास एखादं छोटं पाखरू घिरट्या घालायचं ते बघत बसायचो घिरट्या घालत घालत ते तीथंच भाजून खाली तडफडत रहायचं..
जेवायला बसलो की चीमणी मधी असायची मग आम्ही सारी एकत्रीत गोल बसायचो…शेडूने लिपलेल्या मोठ्या भिंती वर चिमणीच्या समोर आम्ही हात हाताचे बोटे वेडे वाकडे करून वेगवेगळ्या प्राणी पक्षी चे भींतीवर चित्र पहात असू..आई  किंवा ताई स्वयंपाक करत बसली की काही काही वेळा तीची नाक मोठी चेटकीन सारखी दिसायची..ठोके मोठे दिसायचे त्या भींतीवर
चिमणी थंडीत सूध्दा एक वेगळीच उब द्गयायची  गप्पा मारताना मजा यायची.. 
वाकळ घेऊन म्हातारी आज्जी च्या चिटकीनीच्या
च्या गोष्टी आयकायचो , आणि ज्या खोलीत झोपायचो तिथेच फक्त चिमणी असायची
नाहीतर पाणी जरी प्यायला बाहेर जायचं म्हंटल की भीती वाटायची कोणाला तरी बरोबर
घेऊन जावे लागत असत , आणि काय असायचं
त्यावेळेस कोणाकडे एवढी लाईट न्हवती ज्यांच्याकडे लाईट आहे ते त्या गल्लीतील  सर्वात
श्रीमंत माणूस पैसेवान माणूस  संध्याकाळी अश्या श्रीमंत मित्रांच्या घरी खेळत बसलो किंवा आभ्यासाला गेलो की घराकडे यायला नको वाटायचं  लाईटच्या ऊजेडातून घरातील अंधारात एकदम काहीसं मन उदास ही वाटायचं या अंथारात मला कूठेतरी चिमणी शोधायची मग मी तीच्या कडे धावत जायचो…रात्रीचे जेवण लवकरच तयार व्हायचे संध्याकाळीा सात वाजता जेवण आई बनवायची रात्री आठवाजता सारी जेवायची रात्री चे आठ म्हणजे सारं काही बाहेर घरात रस्त्यावर सामसू
, पण एकदा का झोपले की
लय गोड झोप लागायची ,,, ते काहीही असो
मी तर हे दिवस पाहिले आहेत सतत आठवणीत राहतील ते दिवस , जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा आई ला  सारखं म्हणायचो आई आई आपल्या पण घरात लाईट कधी येणार गं? माझा हा निरागसप्रश्न पाहून आई हळूच हसायची पण कदाचित तीला आतून  परिस्थिती च्या वेदना व्हायच्या ते तीच्या चेहर्यावर लपायच्या नाहित हे मी समजायचं..मला म्हणायची तू शाळा शिकून मोठा झाला की मग आपल्या घरात नक्किच आपण लाईट घेऊ
..काही वर्षांनी म्हणजे मी शाळाशिकून मोठा व्हायच्या आधीच घरात लाईट आली
आपोआप चिमणी  बाजूला अडगळीत  सारली गेली पण जेव्हा जेव्हा लाईट जायची तेव्हा तेव्हा पुन्हा त्या चिमणीला शोधायचं माझं काम शिल्लक राहिलेल्या डब्यातील राॅकेल चिमणीत भरून पून्हा पेटवायचं…
सकाळी चूल पेटवताना सूद्धा या चिमणीचे तोडं काढूण त्यातील शिल्लक राॅके ल तेल चूलीतील लाकडावर,शेणिवर ओतून चूल पेटवायची…
ते दिवस  तो उजेड या एल ई डीच्या जमाण्यात सूध्दा नाही मीळणार आनंदाचा..
प्रचंड प्रकाशात आज माणूसकी बाहेरची ही हरवली आहे..व घरातील हि नाते दुरावलेली आहेत..

  • रमजानभाई अत्तार
    गडहिंग्लज
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

2 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular