गुरव

गुरव म्हटले की काय चित्र डोळ्यासमोर उभे रहाते. तर देवळात देवाची पुजाआर्चा करणारा, लोकांंची गाऱ्हाणी देवासमोर मांडणारा, श्रावण महिण्यात गावातील लोकांच्या घरोघरी जाऊन बेलपत्र देणारा, गावातील लोकांना त्याच्या लग्नकार्यात पत्रावळी पुरवणारा गावतील एक हरकाम्या इसम….. झाला.
ही गुरवांची कहाणी….
हिंदु धर्माच्या वर्ण जाती संस्कारा नुसार बारा बलुतेदार पद्धतीनुसार तीन नंबरचा बलुतेदार म्हणजे गुरव समाज. समाज जीवन व्यवस्थितपणे हाताळता यावे म्हणून जातीवार पद्धत निर्माण झाली. खरे तर तो व्यवसाय झाला. मग तो कपडे धुणारा परिट असो. सोन्याचे दागदागिने बनवणारा सोनार असो, वा गावातील शेतसारा लिहिणारा गावात कारकुनी करणारा कुलकर्णी असो… जातीवार समाज रचना झालेल्या व्यवस्थेचे बळीच आपण.
गुरव म्हणून गावातील स्थान आपण आपलेच वाढवले पाहिजे. गुरव समाज हा शैव्य समाज. शैव्य म्हणजे श्रीशंकराची पुजा करणारा हा गुरव. शिवाची पुजा करणारे आपण. शिव +शंकर कोणीतरी म्हटले आहे. शिव वेगळे व शंकर वेगळे . शिव म्हणजे परमअवस्थेच्या पलिकडे पोहचलेला… क्षण किंवा व्यक्ती.
शिवत्व प्राप्त झालेला व्यक्ती…. जागृती.. निद्र… स्वप्न अवस्थेच्या पुढे… परमावस्था समाधी अवस्था असणारा.
मुर्ती पुजा हि आपल्याकडे पुराण काळापासून चालत आलेली रूढ परंपरा. मुर्ती पुजा म्हणजे आकारातून निराकाराकडे चालणारा प्रवास. ही यात्रा म्हणजे मुर्ती पुजा. त्या शिवशंकराचे आपण पुजारी… गुरव.
प्रत्येक गावात वाडीत देवाची पुजा आर्चना करणे हे प्रमुख काम हे गुरवाचे.
गावातील महालक्ष्मी, अंबाबाई, मारुती, रवळनाथ, काळभैरी, यल्लमा देवी, इत्यादी देवीदेवतांची पुजा गुरव समाज करतो. देवाची भक्ती, पुजा करतांना केवळ श्रद्धा, निष्ठा, समर्पण असुन चालत नाही तर संयम ही महत्वाचा. जसे साई बाबा म्हणतात..
” श्रद्धा आणि सबुरी. ही सबुरी म्हणजेच संयम.
देवाची कृपा ठरलेली असते.पण त्या वेळेची वाट पाहण्याचा ” संयम ” ही हवाच.


हा संयम भक्ताच्या मनात निर्माण करावा. हे खरे गुरवाचे महत्वाचे काम आहे.
भागवत धर्मानुसार प्रत्येक जातीत संत झाले. जसे संत सावता माळी,संत कान्होबा, संत रोहिदास,संत गोरोबा काका, तसेच आपल्याही समाजात संत होऊन गेले त्यांच नाव आहे. संत काशिबा महाराज….. यांनी लिहिलेले ग्रंथ आज ही उपलब्द आहेत. संत काशीबा महाराज हे संत सावतामाळी यांचे समकालिन संत होते.
भगवान श्रीशंकराच्या पुजेचा मान हा फक्त आणि फक्त गुरवांनाच आहे. तेच हे आजचे गुरव. ब्राह्मण हे श्रीशंकराच्या पिंडीवर अभिषेक करू शकतात पण श्रीशंकराच्या पिंडीवरील बेल उचलण्याचा त्यांना अधिकार नाही. उत्तरपुजा करण्याचा अधिकार फक्त गुरवांना आहे. गुरव हा प्रांतानुसार वेगवेगळ्या नावात विभागला गेला.
गुरव… जाती / उपजाती / शाखा / भेद आपल्यात ६२ पजाती आहेत.
गुरव — गुरव, शैव पुजारी(प्रचिलित नाम) , शैव पुजारी , शैव गुरव , पुजारी गुरव , भट गूरव , मराठा गुरव , देवलक गुरव , भाटिया गुरव , शिवपुजक गुरव , नगरे गुरव ( नगरचे नगारी नागरी ) , जुन्नरचे जुन्नरे / जुनरी गुरव , निळकंठ गुरव , स्वयंभू गुरव , कडु गुरव , कोटसने गुरव , भाविक गुरव , कोकणातील घाडी गुरव , कोकणातील कुणबी गुरव , अहिरे गुरव , शांडिल्य गुरव ,…
गुरव — गुरवकी व्यवसाय करून पडलेली जात संबंधित आहे.
तामिळनाडूत गुरवांना — गुरूवन म्हणतात.
कर्नाटकात जिर म्हणतात .
गुजरातमधे शिवाल्याशी संबंधित शिवलक वा तपोधन म्हणतात.
गुरव जातीत अनेक पोटजाती ही आहेत. प्रदेशानुसार झाडे , वऱ्हाडे – वरहाडे , खान्देशी अहिरे, नगरे , जुन्नरी , कोकणी , घाटी अशी विभागणी झाली. तर उपासने नुसार जैन्य , हिंदु , लिंगायत अशी विभागणी झाली.
महाराष्ट्र कोकणात गुरव समाजाला कुणबी, कुरवाडी गुरव , घाडी गुरव, भाविक गुरव असे संबोधतात.
काही लोकांकडे पुर्वांपार परंपरेनुसार पाटिलकी आहे. सदर गुरवांना पाटिल गुरव ही म्हणतात.
तामिळ भाषेत गुरवांना नायनार म्हणतात.
कर्नाटकात बलुतेदारांना आयगार म्हटले जाते. म्हणून आम्ही कर्निटकच्या शेजारी रहाणारे. म्हणून गुरवांना गावात आयगारी म्हणतात. गावातील कुजकट बोलणारे हे लोक गुरवाला आयगाऱ्या म्हणतात. आयगाऱ्या हा शब्द शिव सारखाच उच्चारतात. खेद वाटतो.
गावातील पाटिल की , कुलकर्णी, देशमुखी , तशीच गुरवांची किंवा गुरव समाजाची गुरव की… किंवा गावकी असते.
गुरव समाजाने गावकी करता करता आपल्या मुलाबाळांना शिक्षणासाठी ही प्रवृत्त करायला हवे. उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील झाले पाहिजे. शिक्षणानेच आपला समाज सुधारू शकतो. त्यामुळे गुरव बंधुभगिनीने आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष द्यावे.
महंत, गुरु यांना मठ बांधावे लागतात. आणि आपला संप्रदाय वाढवावा लागतो. सुदैवाने परमेश्वराने आपल्याला हक्काचे मंदिर दिलेले आहे. त्या मंदिराचा उपयोग योग्य रितीने करून. आपले प्रस्थ वाढवावे.
गावातील मंदिरातील गुरवाने देवाची पुजा झाल्यानंतर देवाचा प्रसन्न फोटो दररोज व्हाटसप ग्रुपवर शेअर करावा.आता प्रत्येक गावात व्हाटसप ग्रुप आहेतच.
दर्षी श्रावण महिन्यात एखाद्या ग्रंथाचे पारायण लावावे. मंदिरात रोज एखाद्या ग्रंथाचे वाचन करावे. थोडे नामस्मरण ही करावे. मंदिरात नेहमी पवित्र वातावरण राहील असे पहावे.
आज बस इतकच.
( गुरव जाती नावे व शाखा, उप शाखा ही माहिती गुगल वरून घेतली.)

  • – सुरेश सदाशिव गुरव.
    अंबरनाथ पूर्व.
    गाव कोल्हापूर हसुरसासगिरी.
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular