Homeमुक्त- व्यासपीठचहा पिण्याच्या पद्धतीवरून ओळखा स्वभाव

चहा पिण्याच्या पद्धतीवरून ओळखा स्वभाव

चहा पिण्याची प्रत्येकाची विशिष्ट अशी पद्धत असते. त्याचे निरीक्षण केल्यास स्वभावाचा बर्‍यापैकी अंदाज घेता येतो. आपणही निरीक्षण करा आणि अंदाज बांधा…

 • चहा घ्यायचा का चला चहा घेऊ, स्वतःहून अशी ऑफर देणारे सर्वसमावेशक स्वभावाचे असतात. यांचा फारसा कुणाशी वाद नसतो…
 • चहाला प्रथमदर्शनी नाही म्हणणारे परिस्थितीचा अंदाज घेऊन वागत असतात..
 • मोठा भुरका मारून चहा पिणारे फारशी कोणाची तमा बाळगत नाहीत. जे योग्य वाटेल ते करून मोकळे होतात..
 • गरम चहा पटकन पिऊन टाकणारे सतत गंभीर विचार करत असतात. प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेचे टेन्शन घेतात.
 • चहाचा प्रत्येक घोट आस्वाद घेऊन पिणारे महत्त्वाच्या ठिकाणी उशिरा पोहोचतात.
 • चहाचा ग्लास अथवा कप हाताने पूर्ण कव्हर करून पिणारे केअरिंग असतात. आजारी व्यक्तीची जरा अधिक चौकशी करतात.
 • चहा गार अथवा गरम याचा फारसा विचार न करता पिणारे व्यवहार कुशल असतात..
 • विशिष्ट प्रकारच्या चहाची ऑर्डर देणारे फारसे कुणात मिसळत नाहीत..
 • विशिष्ट ठिकाणीच चहा घेणारे पटकन गैरसमज करून घेऊ शकतात…
 • चहा पिता पिता एखादा विनोदी किस्सा सांगणारे थोडेसे बेफिकीर असतात..
 • ग्लास अथवा कप विशिष्ट पद्धतीने धरूनच चहा पिणारे एखाद्या विषयात तज्ञ असतात…
 • सर्वांसाठी चहा सांगतात, पण स्वतः घेत नाहीत, असे चांगले सल्लागार असतात. क्षणात परिस्थिती ओळखतात..
 • नियमित प्रकारातला चहा न घेता विशिष्ट पद्धतीचा चहा घेणारे अबोल अनप्रेडिक्टेबल असतात..
 • चहा शिवाय ज्यांची बॅटरी चार्ज होत नाही, अशी मंडळी महत्वाच्या निर्णयांची बऱ्याच ठिकाणी खात्री करूनच ठरवतात.
 • बसूनच शांतपणे चहाचा आस्वाद घेणारे कमी लाभाची परंतु खात्रीशीर गुंतवणूक करतात…
 • बशीतून चहा घेणारे कोणत्याही बाबतीत लवकर कन्व्हिन्स होत नाहीत…
 • चहा घ्यायचा म्हणून घेणारे गाव मित्र असतात..
 • चहा गार करून पिणारे कलाकार असतात. बोलताना अचूक शब्दच वापरण्याकडे कल असतो.
 • चहाची वेळ अजिबात न चुकवणारे, प्रसंगी एकटा चहा पिणारे सहजपणे शब्दात अडकू शकतात..
 • अधून-मधून चहा घेणारे नर्मविनोदी असतात..
 • चहा संपेपर्यंत अजिबात न बोलणारे चिडखोर असू शकतात…
 • चहासोबत बिस्किट खारी अथवा पाव खाणारे कोणत्याही परिस्थितीत मध्यम मार्ग स्वीकारतात…
 • कोणत्याही प्रकारचा चहा बिलकुल वर्ज्य असणारे लोक स्वतःच करून घेतलेल्या एका विशिष्ट चौकटीत राहत असतात..

आपणही आपले
निरीक्षण नोंदवा.

 • साभार – कुठेतरी वाचलेले

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular