शहाजींनी स्वप्न पाहीले,
जिजाऊंनी मनी बिंबवीले.
मावळ्यांना एकत्र केले,
शिवरायांचे स्वराज्य घडले.१
गुलामगिरी ती परकीयांची ,
अत्याचार अन् जुलूमाची ,
तोडूनी शृंखला परदास्याची.
सत्ता स्थापीली रयतेची. २
स्वराज्य उभारणीसाठी ,
मावळे रणांगणावर झुंजले.
एकेका महान नररत्नांसाठी,
डोळे सह्याद्रीचे पाणावले .३
रायबाचे लग्न थांबवूनी ,
केली चढाई तानाजीने.
सूर्याजी ,शेलार मामानी,
रण गाजवीले पराक्रमाने.४
ढाल तुटता तानीजीनी,
केली लढाई पागोट्यानी.
चिरनिद्रा घेतली तानाजीने,
उदयभानाचा घाव लागुनी.५
सूर्याजीच्या प्रेरणेनी ,
भीडले मावळे यवनांशी.
कोंढाणा किल्ला जिंकूनी,
अद्दल घडविली फिरंग्यांनी.६
शोक अनावर शिवरायांचा,
सखा गमवीला जीवाभावाचा.
तानाजीरूपी त्या नररत्नाचा,
संन्मान वाढवीला सिंहगडाचा .७
कवी. श्री रेवाशंकर वाघ ठाणे
मुख्यसंपादक