Homeवैशिष्ट्येजवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या Aadhaar , Pan , Voter ID, Passport...

जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या Aadhaar , Pan , Voter ID, Passport चे काय करावे ?

आजकाल सर्व घरातील व्यक्तीचे आधार कार्ड , पॅन कार्ड , मतदान कार्ड तसेच पासपोर्ट ही कागदपत्रे असतात. पण व्यक्ती मृत झाल्यास त्या कागदपत्रांचे काय करावे हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतो. ते ठेवावे की नको किंवा ते असेल नसेल तर काय फरक पडतो हे लोकांना माहीत नाही.
ही कागदपत्रे माणूस हयात / जिवंत असताना वेळोवेळी खूप उपयोगी पडतात. जर यातील कागदपत्रे नसतील तर सरकारी कामे अडखलेली तुम्ही पहिली अनुभवली किंवा एकीवण्यात आलेली असतीलच. पण जेव्हा माणूस मृत होतो तेव्हा त्या कागदपत्रांचा उपयोग काय ?ते सरकारकडे जमा करायचे असते का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला होता का ? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे ; चला तर जाणून घेऊ…

आधार कार्ड : आधार नंबर तुमची ओळख , पत्ता आणि विविध योजनांच्या वापरासाठी उपयोगी येतो ; मात्र संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर या आधार कार्डचा गैरवापर न होण्याची काळजी वारसांनी घ्यावी . UIDAI कडे हे आधारकार्ड रद्द करण्याची किंवा त्यावर मृत अशी नोंद करण्याची कोणतीही सोय नाहीय , असे सेबी रजिस्टर्ड गुंतवणून सल्लागार जितेंद्र सोळंकी यांनी सांगितले._

मतदान कार्ड मतदान ओळखपत्राचे मात्र तसे नाही आहे. निवडणूक आयोगाकडे फॉर्म नंबर ७ भरून मयत व्यक्तीचे ओळखपत्र रद्द करण्याची सोय आहे. यासाठी स्थानिक कार्यालयात मृत्यूपत्राची प्रत द्यावी ._ 

पॅन कार्ड : पॅन कार्डचा वापर बँका, आयकर भरण्य़ासाठी वापरले जाते. मृताचा आयकरही त्या वर्षासाठी भरता येतो. हे खाते बंद होत नाही तोवर पॅन कार्ड गरजेचे आहे. आयकर विभाग जोवर भरलेला रिटर्न प्रोसेस करत नाही , तोवर हे पॅन कार्ड ठेवावे लागणार आहे. यानंतर बँक खाते वगैरे बंद करून हे पॅन कार्ड आयकर विभागाकडे सरेंडर करावे._ 

पासपोर्ट : आधार कार्ड प्रमाणेच पासपोर्टमध्येही सरेंडर किंवा रद्द करण्याची सोय नाही . एकदा का पासपोर्टची व्हॅलिडिटी संपली की तो आपोआप रद्द होतो. हा पासपोर्ट मृत्यूनंतर वारसाने ठेवणे हे हुशारीचे ठरू शकते. कारण पुढे कोणत्याही कायदेशीर गोष्टींसाठी तो लागू शकतो. मृत्यू प्रमाणपत्रासह तो ठेवता येतो.

सो- इंटरनेट

  • संकलन – लिंक मराठी टीम
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular