हॉस्टेल मध्ये माझ्या बाजूच्या रूम मध्ये दोन अंध मुली रहात होत्या. खुप मनमिळाऊ होत्या. नावं आठवत नाहीत आता. दोघी अंध त्यामुळे देहबोली साधारण सारखी च होती दोघींची. त्यामुळे दोघींमधला फरक कधी कळलाच नाही. त्यावेळी माझ्यासाठी ते तेवढं महत्वाचं नसेल कदाचित ! येता जाता नेहमी बोलायच्या माझ्याशी.
एकदा माझी तब्येत बरी नसल्याने मी कॉलेजला दांडी मारली होती. दुपारच्या जेवणासाठी मेस मध्ये गेले.तिथे इतर कुणीच नव्हतं फक्त ती अंध मुलगी जेवत बसली होती. दुपारच्या जेवणासाठी खुप कमी मुली असायच्या. त्यामुळे ज्या टेबलवर कुणी असेल त्याच टेबलवर जाऊन बसावं लागायचं.त्या दिवशी कुणाशी बोलायचा अजिबात मुड नव्हता माझा. मी माझं ताट वाढून घेतलं आणि तिला माझी चाहूल लागु नए म्हणून आवाज नं करता ताट टेबलवर ठेऊन अलगद खुर्ची सरकवून मी बसले. क्षणात तिचा प्रश्न… सुजाता का ? एकटं एकटं जेवताना माझी सोबत मिळाल्यामुळे तिचा चेहरा खुलला होता. मला मात्रं आश्चर्याचा धक्का बसला होता!
मला डोळे असुनही कधी त्या दोघींमधला फरक कळला नव्हता. मात्र माझी थोडीशी चाहूल तिच्यासाठी खूप होती मला ओळखण्यासाठी.
जन्मा पासून डोळ्यात अंधार घेऊन फिरणारी ती आणि दिसत असुनही अंध असलेली मी…. खोल ह्रदयात जाऊन बसला हा प्रसंग!!
या खोट्या, दिखाऊ दुनियेपासून कित्येक मैल दूर होतं तिचं स्वच्छ, पारदर्शक जग!
जेव्हा कधी एखादी अंध मुलगी दिसते तेव्हा तिची आठवण येते.आता कुठे असेल…. कशी असेल…. असेल …. नसेल… पण एक सॉरी जपून ठेवला आहे दोन डोळ्यांच्या रूपात मी गेल्यावर देण्यासाठी…..
नेत्रदान बाबत तुमचे मत काय आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा ….
- सुजाता राऊत निगडे.
मुख्यसंपादक
नमस्कार….
आज नेत्रदान करणे खूप महत्त्वाचं आहे…..
आपल्या लेख मधून खुप काही समजून घेण्यासारखे आहे….
आपल्या सर्वांना डोळे असूनही जग आंधळं आहे असे भासत असते, परंतु जे जन्मापासूनच अंध आहेत ते मात्र जगात एक स्वयंप्रकाशित किरण बनून उभे आहेत……
आपल्या मौल्यवान अशा निर्णयाला सलाम…..
धन्यवाद……
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )
Thanks☺
मला नेत्रदान करायचे आहे पण त्याची प्रोसेस माहीत नाही .