Homeमुक्त- व्यासपीठजातशाही की लोकशाही

जातशाही की लोकशाही

भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव
ही प्रार्थना शाळेत पहिली पासून महाविद्यालयीन शिक्षणा प्रयंत म्हणत आलो एकत आलो
पूस्तकाच पहीलं पाण उलटलकी हीच प्रार्थना डोळ्या समोर यायची .
जशी जशी स्वातंत्रदीन आणि प्रजासत्ताक दिन जवळ जवळ यायचा टिव्हीवर रेडिओवर देशभक्तीपर गीते काणावर पडायची , खूप वेगळाच फिल यायचा आपण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे नागरिक आहोत याचा आनंद वाटायचा. पण जस जसे प्रार्थमीक माध्यमीक शिक्षण,पुर्ण करुन महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळलो तेंव्हा फिसमधील जातींवर आधारित तफावत असो वा आवडते कॉलेज निवडतांना आणि नौकरी सोधण्याची वेळ आली तेंव्हा कळाले की आरे आपण तर जगातील सर्वात मोठ्या जातशाही देशांत रहातो लोकशाही सर्वधर्मसमभाव, फक्त पूस्तकातच सांगण्या बोलण्यापुरतेच.
या देशाची व्यवस्था इतकी जातीवर आधारित आहे की दवाखान्यात मूल जन्माला आले की त्याची पहिली नोंद सरकारी दप्तारात त्याचं नाव ठरवण्या अगोदर त्याचा बाप कोणत्या जाती प्रवर्गातून येतो हे नोंदवून घेतले जाते.
इथे शिक्षण जातीवर आधारित, कोणता विषयांत प्रावीण्य आहे हे न बघता तो कोणत्या जातीत जन्म झाला यावर ठरवले जाते त्याणे कोनता विषय निवडावा. नोकरी जातींवर आधारित, सोई सुविधा जातींवर आधारित, पूढे सवलती ह्या सर्व जातीवर आधारित. इतकच नाही तर पोलिस केस कोर्टात न्याय सुद्धा जातीवरच होणार या लोकशाही देशात.
ही जातशाही या देशाला इतकी चिटकवून बसली आहे की काही केल्या तिच्यात बदल संभवत नाही. आंधळी न्यायव्यवस्था, दगडासारखी निगरगट्ट व्यवस्था भावना, संवेदना देशातील धुसफूस कधी नव्हे तो अंतर्गत जातशाही मुळे अस्वस्थ अस्थीर आणि जाती जमाती मध्ये गुरफटलेला. कधी नव्हे त्या जातीच्या टोकदार झालेल्या आस्था आस्मीता .
मराठा क्रांती मोर्चा किंवा कोपरडीच्या श्रद्धा ताईच्या बलीदाना नंतर या देशातल्या भावणा विरहिन जातशाही उघडी पडली . तोवर येथील मराठा समाज प्रचंड अंधारात बेगडी सर्व समभावाच्या आविर्भावात होता. करोडोंच्या संख्येने रस्त्यांवर उतरलेला समाज आणि व्यवस्थेने, समाजाने न घेतलेली दखल. साठ सत्तर तरुणांनी आत्मबलीदान करुनही गेंड्याच्या कातडीच्या व्यवस्थेला नरमाई दाखवता आली नाही. तरीही या वेवस्थेने जाणून बुजून प्रवाहाबाहेर ठेवलेल्या समाजाने कधीच आपली देशनिष्टा ढळू दिली नाही. मावोवादी, नक्षलवादी,वा दहशतवादी, यांच्यासारखे हातात शस्त्र उचलले असते तर काहीच अशक्य नव्हते. ज्या देशाला उभारण्यासाठी रक्ताच शिंचन ज्यांनी केले त्याच पुर्वजांचे आम्ही वारसदार आहोत. बलीदानाची त्यागाची शौर्याची परंपरा असणारा हा समाज बंड करून उठला नाही याचे एकच कारण या देशाच्या सार्वभौमत्वावर असलेली त्याची निष्टा. आम्हीही याच देशाचे नागरिक आहेत.आमचाही या देशातील व्यवस्थेत तितकाच वाटा हवा. हे नाही वाटल कोन्हाला हे हा निगरगट्ट पणा कमी की काय प्रचंड प्रमाणात प्रतीमोर्चे काढून त्यांनी या देशातील असमानता अधीकच जगासमोर आली.
प्रजासत्ताक दिनाच्या संदर्भाने वरील निरिक्षणे मांडताना या देशासाठी हुतात्म्यांनी, शहीदांनी दिलेले बलिदान विसरताच येत नाही. ज्या वेळी देश स्वातंत्र झाला तेंव्हा त्यांनी कोनत्या सार्वभौम देशाची कल्पना केली असेल. अन् आज वास्तव काय आहे.

http://linkmarathi.com/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%95-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5/

जगन्नाथ काकडे
मेसखेडा

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular