जेव्हा आकाशात उडायचं होत
तेव्हा आभाळ भरून आलं
भरलेल्या त्या आकाशात
उडायचं माझं राहून गेलं
जेव्हा यश हाती होतं
दुःखाचं सावट माझ्यावर नव्हतं
अपयश जेव्हा हाती आलं
यशाचं महत्व मला कळाल
जेव्हा आयुष्य जगायचं होत
तेव्हा मरण दाराशी आलं
जगायचं होत खूप मला
पण मरण तेव्हा कवटाळून गेलं…
- रेश्मा जोशी (रेष )
मुख्यसंपादक
Superb..nice Reshma