महीना भाद्रपदाचा गौरी गणपतीचा,
अनुराधा नक्षत्रावर आवाहन करण्याचा,
ज्येष्ठा नक्षत्रावर देवी गौरीशी पूजण्याचा,
मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करण्याचा.१
कुलाचार महाराष्ट्रातील परंपरेने गौरीपूजनाचा ,
माता श्री गणेशाची गौरी देवीशी पूजण्याचा.
विभिन्न रूढी ,प्रथा पद्धती थाट वेगळेपणाचा,
सुंदरतेने सजलेला चेहरा गोड मुखवट्याचा.२
कोकण प्रांती मान असे तेरड्याच्या फांदीचा ,
कुणी धातूची मूर्ती बसवी कुणाचा मान खड्यांचा.
भावभक्तीने गौरी जागविती खेळ जागरणाचा,
व्यथा वेदना विसरूनी थोड्या,येई दिन आनंदाचा.४
देवी श्री लक्ष्मीच्या पावलांनी गौरी घराशी येई,
पाहूणचार घेऊनी गौरीआई स्वस्थानासी जाई.
गणपतीसंगे देवी गौरीचेही विसर्जन ते होई ,
लेकी सुना अन् भक्तजनांशी देवी आशिर्वाद देई.५
गौरीपूजनाच्या शुभ प्रसंगी मझे काव्यसुमन देवी श्री गौरी मातेच्या चरणी समर्पित करीत आहे.
श्री रेवाशंकर वाघ ठाणे .
मुख्यसंपादक