Homeघडामोडी‘ ठाकरी बाणा दिसला, आता पवारांनी राजीनामा घ्यावा ’

‘ ठाकरी बाणा दिसला, आता पवारांनी राजीनामा घ्यावा ’

मुंबई – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडें प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच राठोड यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. ते प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आहेत. त्यानुसार आधीच ठाकरी बाणा दाखवायला हवा होता, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र अखेरीस का होईना राजानीमा घेतला, असं पाटील म्हणाले. तसेच राठोड यांचा राजीनामा घेतला. जे उद्धव ठाकरेंनी केलं ते शरद पवारांनीही करावं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

राजीनामा घेण्याची गरज नव्हती, अजून तपास सुरु आहे

आम्ही लोकांचा, विरोधकांचा आवाज एकतो. राजीनामा घेण्याची गरज नव्हती कारण अजून तपास सुरु आहे. संजय राठोड जूना कार्यकर्ता आहे. विरोधी पक्षाचा जय झाला असे अजिबात समजू नये. जिथे जिथे भाजपचे सरकार आहे तिथेही असे प्रकार घडले. त्या मुलीची आत्महत्या की हत्या हे दुर्दैव आहे, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथील मुलाखतीत मांडली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यावर ते बोलत होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular