Homeघडामोडीवसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याकडून साखर वाटपास ३१ मेपर्यंत मुदतवाढ

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याकडून साखर वाटपास ३१ मेपर्यंत मुदतवाढ

आजरा : वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना मार्फत सभासद व ऊस उत्पादकांसाठी सुरू असलेल्या सवलतीच्या दरातील साखर वाटप योजनेस ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी दिली.

https://youtube.com/post/UgkxYcgDwnuTlYQG6kvcT4aRa-Yc6JLayaj2?si=O_LwbvNLtAQWa5T3

कारखान्याकडे अनुक्रमे रु. १५,०००, रु. १०,००० व रु. ७,००० इतकी शेअर्स रक्कम जमा असलेल्या मंजूर सभासदांना अनुक्रमे ५० किलो, २५ किलो व १५ किलो साखर सवलतीच्या दरात दिली जात आहे. तसेच गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या उत्पादकांना प्रति टन अर्धा किलो साखर सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे.

यापूर्वी या साखर वाटपाची मुदत १५ मेपर्यंत होती. मात्र सभासदांची सोय लक्षात घेऊन कारखाना व्यवस्थापनाने ही मुदत वाढवून ३१ मे २०२६ पर्यंत करण्यात आली आहे.

सभासदांनी संबंधित शेती सेंटर कार्यालय अथवा कारखाना कार्यस्थळ येथे अपुरी शेअर्स रक्कम भरून तालुका संघाच्या संबंधित शाखेतून साखर उचल करावी, असे आवाहन अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी केले आहे.

महत्त्वाची सूचना

साखर उचल करताना सभासद व ऊस पुरवठादारांनी आधार कार्डची झेरॉक्स प्रत जमा करणे बंधनकारक असल्याचे कारखाना प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular