Homeघडामोडीतरूण उत्साही दुर्गा माता मंडळ मंगरूळ चवाळा च्या वतिने लसिकरण शिबिर

तरूण उत्साही दुर्गा माता मंडळ मंगरूळ चवाळा च्या वतिने लसिकरण शिबिर

मंगरूळ चवाळा
( मनोज गावनेर ) -: दि. 13 अॉक्टोबर: मंगरूळ चवाळा येथील तरूण उत्साही दुर्गा माता मंडळ आपल्या नाविन्यपूर्ण सामाजिक, कृषी, शैक्षणिक, स्त्रिसक्षमीकरण इत्यादी उपक्रम राबविण्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये अग्रेसर असणारे मंडळ आहे. त्यामध्ये विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन, तरूण उत्साही पुरस्कार, शेतकरी मार्गदर्शन, महिला मार्गदर्शन, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व राज्य पातळीवर दखल घ्यावी असे संपूर्ण नवरात्री महोत्सवामध्ये सामाजिक जनजागृती करण्याचे कार्य तरूण उत्साही दुर्गा माता मंडळ मंगरूळ चवाळा करत असते.

http://linkmarathi.com/सप्तशृंगी-गड-वणी/


मागील वर्षीपासून संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीच्या रूपात मोठे संकट उभे ठाकले. शासनाने कोरोनाकाळात सर्वांच्या आरोग्यदायी जीवनासाठी अनेक निर्बंध घातलेले आहे. त्या सर्व शासनाच्या नियमांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. पण सामान्य माणसामध्ये कोरोना विषयीची जनजागृती करून त्यांना नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती करण्याचे काम मंडळ करत आहे आणि यावर्षीचे सर्व कार्यक्रम नियमांचे पालन करत व कोरोना जनजागृती, स्वछतेचे महत्त्व, पौष्टिक आहार इतर आरोग्य विषयक उपक्रमांवर आधारित आहे.

तरूण उत्साही दुर्गा माता मंडळाच्या वतिने ‘कोरोना भगाओ जनजागृती आवाहन’ चे गावातील सर्व शासकीय व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत पत्रकाचे प्रकाशन केले. हे पत्रक प्रत्येक घराघरात वाटून नागरिकांची कोरोना जनजागृती करण्याचे कार्य मंडळ करत आहे. याद्वारे कोरोना भगाओ जनजागृती आवाहन करण्यात आले. ज्यामध्ये ‘मी आणि माझा परिवार माझी जबाबदारी’ हे ब्रिद ठेवून स्वच्छता, नियमांचे पालन व मानवता धर्म सांगितला. पण फक्त जनजागृतीच न करता कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी व प्रतिबंध करण्यासाठी कृतीशिल उपक्रम सुद्धा राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीर सुद्धा तरूण उत्साही दुर्गा माता मंडळ मंगरूळ चवाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ चवाळा यांच्या वतिने राबविण्यात आले होते. कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी लसिची मोठी भूमिका आहे आणि सर्वांचे लसिकरण व्हावे व सर्वांना ते घेणे सोयिस्कर व्हावे यासाठी लसिकरण शिबिर आयोजित केले होते व पुढील दिवसांमध्ये ही जास्तीत जास्त लोकांनी लसिकरण करावे यासाठी जनजागृती करण्यात आली.

http://linkmarathi.com/तिचं-sorry-आणि-hi/

त्याचप्रमाणे प्रत्येक घरामध्ये स्वच्छता रहावी यासाठी ‘घर स्वच्छ स्पर्धा’ तरूण उत्साही दुर्गा माता मंडळ मंगरूळ चवाळा च्या वतिने आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये गावातील प्रत्येक घरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत येथील प्रतिनिधी समवेत जाऊन परिक्षण करण्यात येईल व प्रत्येक कुटुंबात जनजागृती करण्यात येणार आहे.

प्रकाशन सोहळ्यामध्ये मंगरूळ चवाळा पोलिस स्टेशन चे ठाणेदार पडघान साहेब, प्राथमिक आरोग्य केंद्र येथीद वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहल ठाकरे मॅडम, ग्रामसेवक रबडे साहेब, दैनिक नवराष्ट्र चे तालुका प्रतिनिधी तथा साप्ताहिक पहारेकरी चे मुख्य संपादक संजय मंडवधरे, जि.प. कनिष्ठ महाविद्यालय येथील प्राचार्य प्रा. कोळी सर, प्रा. पाटनकर मॅडम, प्रा. तोडसाम मॅडम, जि.प. प्राथमिक शाळा मधील प्राचार्या प्रा. विंचुरकर मॅडम, प्रा. गावंडे सर, प्रा. बावनकुळे सर, प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ चवाळा येथील राठोडभाऊ, कंगाले ताई, प्रियंकाताई बेलसरे, ग्रा.पं. सदस्य अतुलभाऊ ठाकुर, पत्रकार विनेशभाऊ बेलसरे, रमेश ठाकरे, क्रांतिज्योती सावित्रीच्या लेकी महिला आधार फाउंडेशन च्या नम्रताताई तांबटकर, रूपालीताई अवझाडे, रिंकुताई शिंदे, आशा सेविका मिराताई साबळे, बेबीताई कडुकार हजर होते. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक मंडळाचे मुख्य व्यवस्थापक गणेशराव अवझाडे, अध्यक्ष सतिश शिंदे, मनोज गावनेर, निखिल चौधरी, प्रज्वल तांबटकर, पंकज चरपे, गोपाल गुल्हाने, जय चरपे, राज अवझाडे कार्यक्रम आयोजित केला.

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular