Homeमनोरंजनतिचं Sorry आणि hi

तिचं Sorry आणि hi

च्यायला… हे बरं जमतं कुणाकुणाला…
येतेच मी लगेच.. बोलू नंतर…
म्हणायचं असलंच काही तरी..
अंन द्यायचा  मंतर..

आमचं काय… काम ना धंदा..
आयुष्यभर वाट बघत बसलो तरी,
ह्यांना कसला वांधा…

http://linkmarathi.com/तुम्ही-वापरत-असलेल्या-गु/

आता येईल.. मग येईल….
आता येईल.. मग येईल….
बघत बसा वाट..
दिवसाची रात्र होते..
रात्रीची पहाट…

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/

मग वाटतं सालं जाऊ दे..
वाट पहायचं राहू दे..
आपण आपल काम करू,
तिला तिचं करू दे..

कामात गुंतायचा प्रयत्न  करता करता..
Excel मध्ये काळं-पांढरं भरता भरता..
मधेच एक विचार
मेंदूत वळवळतो…
हि बरी तर असेल ना??
मग माझा मीच कळवळतो…
पुंन्हा सुरु होतो मग
वाट बघण्याचा खेळ..
घडी कधी दाखवते १२,
कधी 1 ची वेळ ..

http://linkmarathi.com/नवरात्र-आणि-उपासना/

मग हिरमुसून आपणच
म्हणतो शेवटी गुडबाय..
उद्या असणारच आहे काहीतरी कारण..
तेच sorry अन hi…

  • अज्ञात
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular