Homeमुक्त- व्यासपीठ"तिसरा भाग" तिच्या पेक्षा तो तिच्यात जास्त झाला…

“तिसरा भाग” तिच्या पेक्षा तो तिच्यात जास्त झाला…

प्रीती आणि प्रतीक ची अशी झालेली भेट पाहून तुम्हा सर्वांना वाचताना खूप आनंद झाला च आहे..
तिसरा भाग लिहिणार की नाही हे मलाच माहीत नव्हतं पणं खूप काही सुंदर सुचलं आहे….नक्की वाचा…

शेवटची तिची समुद्रकिनारी झालेली भेट..

त्यानंतर ते एका मंदिरात गेले होते तिथेच तिच्या मामाच्या गावी..घरी जाता जाता वाटेत च होत..
प्रतीक ला त्यांनी अश्या पद्धतीने तिच्या आयुष्यात , आणलं त्यासाठी आभार व्यक्त करण्यासाठी ,

http://linkmarathi.com/किंकाळी/

प्रीती हात जोडून बोलत होती देवाशी
प्रतीक च्या असण्याने मी जे प्रेम जगू शकले, त्यासाठी खूप खूप आभार देवा तुझे,
आयुष्यभर त्याची जीवन संगिनी बनून राहायचं आहे, त्याच्या प्रतेक सुख दुःखात त्याची सावली व्हायची आहे, त्याच्या चेहऱ्यावर च हसू व्हायचं आहे, माझी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या त्याच्या सोबत च्या व कुटुंबा बाबतच्या मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन..
मला जगायचं आहे प्रतीक सोबत तुझा आशीर्वाद माझ्या सोबत नेहमी असुदेत……देवा

( ते दोघेही तसेच आई बाबा कडे शहरात आले)

घरी गेले आई बाबांना सविस्तर सांगितल काही महिने सेटल होण्यास प्रितीच्या वडिलांनी प्रतीक ला सांगितलं, लग्नाचं पणं ठरवलं…च

अश्या रीतीने ते दोघे आपल्या प्रेमात , जगात खुप खुश होते..

( आता या भागात थोडा वेगळाच कन्सेप्ट आहे.. आशा आहे खूप आनंद घ्याल..
यात पात्र आहेत यम, चित्रगुप्त, यामीका/ यामिनी, प्रीती, आजी, प्रतीक , प्रितीचे आई व बाबा )

……

प्रीती तशी काळजी पूर्वक च आपली काम करत असे पण वेळ काही सांगून नाही येत,…

तिच्या घरापसून ती तिच्या कामावर जाईपर्यंत खूप खडतर प्रवास करायची बस, रिक्षा त्यात वळणांवनाची रस्ते आणि खूप सारी सिग्नल,
आणि त्यात वाहन कशी चालवतात चालक आपल्याला ही माहीतच आहे, सकाळी सर्व काम आवरून प्रीती कामावर जात होते नेहमीप्रमाणे ..

रस्ता क्रॉस करतच होते काळजीपूर्वक की धावत येणाऱ्या कार ने तिचा अपघात केला…

सिग्नल वरून लोक धावपळ करत होते तिला वाचवण्याचा प्रयत्न …..चालू झाला , सिग्नल वरचे पोलिस, झालेल्या घटनेकडे लक्ष देत होते..

क्षणार्धात प्रीती चा देह रक्ताने माखलेला , सिग्नल वरील चित्र अगदी च लाल झालं होत,

पण इकडे..

http://linkmarathi.com/मानसिक-आरोग्य-म्हणजे-काय/

प्रीती उठली त्यातून पण …
तिला काही रक्त वगैरे लागलेलं नव्हतं. (आश्चर्य)

जरा इकडे तिकडे तिने पाहिलं तर तिला कळलं की तिचा अपघात झाला आहे तीच शरीर एम्बुलन्स ने उचललं जात होत..
याचा अर्थ मी कोण आहे,..मी हयात नाहीय का..?
मला कोणी का पाहत नाही ? समोरच्या व्यक्तीला आवाज देत ती म्हणत होती “ऐका मी ठीक आहे”
मला पहा कोणीतरी म्हणत म्हणत रडत होती..
याचा अर्थ तिला कळत होत की आपल आयुष्य सम्पल आहे ..

आई, बाबा ,प्रतीक यांना मी पुन्हा कधी पाहू शकणार नाही ..?
ते मला कधी पाहू शकणार नाही,..?
जमलेली लोकसंख्या , पोलिस, गर्दी, माझा अपघाती पडलेला देह, ही थांबलेली हवा, ही सृष्टी काहीतरीच होत होत मला..

माझ्या शिवाय कसे राहतील आई बाबा आणि प्रतीक …आई, बाबा,.प्रतीक म्हणून जोरात जोरात ओरडत होती पणं ऐकणार कोणी च नव्हतं ..

काही वेळ झाला रडून रडून तिचे हाल झाले होते…पणं मन घट्ट केले तिने..

इकडे प्रीती डोळे पुसत पुसत पाहते तर समोर एक व्यक्ती मिष्याना पिळ देऊन अगदी ताठ मानेने उभे ठाकलेले काळी वस्त्र घातलेला त्याच्या काळया ऑडी मधून आले होते ते दोघे…

कोण हे आले होते तिला काहीच कळत नव्हतं., तिच्याकडेच पाहून म्हणत होते चल बाळ तुला घ्यायला आलो आहे .

प्रीती: पण ….कोण तुम्ही ..?

यम: मी बाळा तुला घेण्यास आलो आहे तुझ्या जीवनाची रेषा संपली आहे मरणानंतर मीच असतो सर्वांना घेऊन जातो. यम म्हणतात मला
आणि हे चित्रगुप्त

प्रीती:
.पणं माझ्या देहात श्वास तर अजून चालू आहे,..मी अजून मृत नाही झालेली तरीही तुम्ही मला कस काय घेऊन जाऊ शकता..

यम: यमलोकी पोहचे पर्यंत पूर्ण श्वास बंद होईल आपला प्रवास दूरचा आहे बाळा..म्हणत तिला समजावलं

प्रीती: ( प्रीतीने रडण थांबवलं, आणि जे आहे ते स्वीकारलं ) चालेल चला आपला प्रवास सुरू करू

चित्रगुप्त: खूप धाडसी आहेस ग तू लगेच स्वतः ला स्मजवलस आमच्या सोबत येण्याचं किती मोठ धाडस…
नाहीतर इतर वेळी लोकांना घेऊन जाताना तासन तास थांबावं लागत येतच नाहीत वर यमलोकी जायला..

यम: आता आमच्या हातात थोडीच आहे बाळा जन्म मृत्यू

प्रीती: पणं माझी एक इच्छा आहे, आई बाबांना पहायचं आहे घरी जाऊन आणि प्रतीक ला सुद्धा पहायचं आहे… प्लीज ना यम काका मला पुन्हा नाही येता येणार…

चित्रगुप्त: हरकत नाही बाळा ‘ यम देवा चला घेऊन जाऊ ” हिला

यम : अरे इंधन भराव लागणार , पेट्रोल पंप शोधावा लागेल प्रथम,..

चित्रगुप्त : शोधू आपण ….पेट्रोल पंप ..
मरताना शेवटची इच्छा पूर्ण करावी नाहीतर इच्छा अपूर्ण राहतात आणि प्रीती बेबी किती सामजस्य आहे…नक्की प्रभू आपण पेट्रोल पंप शोधू..

प्रवास चालू झाला…
एकदाच ची प्रीती घरी आईकडे आली
..आई देवाऱ्या समोर बसून पूजा करत होती.प्रीती आईला निहाळून पाहत होती ..
..रडू आवरत नव्हत…तिला .
तिचा स्पर्श होत नव्हता, तिच्या कुशीत बसून एकदा झोपावस वाटत होत ,
पणं आता वेळ नव्हती ती झोपण्याची..तिने अलगद पाय धरले आईचे आणि सांगावा घेतला,…

इकडे बाबा ना शोधणारी प्रितीची नजर…..

बाबा कामावर जाण्याची तयारी करत होते, नाश्ता करत बसले होते, बाजूलाच उभी राहून प्रीती एकटक पाहत होती बाबांना

इथून पुढे बाबा ..
” हा चहा घ्या, नाष्टा करून जायचं ह.. अस मी म्हणू शकणार नाही बाबा ” म्हणून ढसा ढसा रडत होती..

नीट जा काळजी घे म्हणणारे बाबा माझा मृतदेह पाहून काय वाटेल त्यांना याची च हुरहूर लागलेली ..

पळत धावत येऊन बाबांना मी गळ्यात मारणारी मिठी आज पासून अदृश्य होणार..कसे जगतील आई बाबा माझ्याशिवाय..
कसे ..???

म्हणत प्रीती ने स्वतः अश्रू थांबविले आणि तिथून काढता पाय घेतला..

जाताना देवा समोर नेहेमी वात लाऊन जाणारी प्रीती देवाला म्हणत होती लवकर माझी वात विझवलस देवा…
मी नसताना तुला या सर्वांची काळजी घ्यायची आहे..तूच समजव आता यां सर्वांना..निशब्द आहे मी..

माझा प्रवास इथपर्यंत च होता आई बाबा पुन्हा मी तुमच्या पोटी येईन मला तुम्हीच हवे आहात…म्हणत निघाली ती …

पुन्हा प्रतीक कडे पणं जायचं होत…
थोड्याच वेळात..
प्रतीकच्या घरी प्रीती पोहचली ..
तेंव्हा प्रतीक झोपला होता सकाळचं साधारणः ९ वाजले होते.,रात्रीच त्याला कामावरून यायला उशीर झाला होता त्यामुळे प्रीती समजून गेली..कालच त्याने माझ्यासाठी मंगळ सूत्र बनवून आणलं आहे ते उष्या जवळच घेऊन तो झोपला होता, किती वाईट वाटावं प्रीतीला की ते मंगळ सूत्र तीच स्वप्न होत आणि ते स्वप्न स्वप्नच राहील….डोळ्यातून अश्रू धारा वाहत च होत्या..

त्याच शांत आणि गाढ झोपले ल एकटक पाहत राहण तिला खुप आवडत होत..
पण पाल चुकचुकली थोड्या वेळात तिच्या मेंदूत संनकण अशी एक कळ येऊन गेली..

“माझं तुझ्या आयुष्यातून अस कायमच जाणं जेंव्हा तुला कळेल तेंव्हा तुझी ही शांत झोप उडेल याची खूप खंत वाटते,..

झोपलेल्या प्रतीक च्या माथ्यावरून हात फिरवत प्रीती बोलत होती ” माफ कर प्रतीक अगोदर प्रेमा पासून पळत होतास आणि आता जेंव्हा तुला इतकं प्रेम झाल माझ्यावर तर माज अस जान तुला खूप त्रास देणार आता अस वाटत य की मला माहित अस्त मी हे जग सोडून लवकर जाणार आहे तर तुला त्या प्रेमाची जाणीव कधीच करून दिली नसती…म्हणत रडत होती….”

वेळ काही सांगून येत नाही आयुष्यात बाळा…म्हणत चित्रगुप्त मागे उभा राहिला..

चित्रगुप्त: चल बाळा वेळ होत आहे.

प्रीती: त्याचा शेवटचा हाताला स्पर्श करू पाहत होती पणं झाला नाही ….आणि तेथून निघाली..

तिने पाठी वळून नाही पाहिले .. आता जमिनीवरची सर्व नाती तिला सोडायची होती…देवा वर विश्वास होता तोच सावरेल यांना..

यम: किती वेळ बाळा चला आता
चित्रगुप्त: हो हो चला अजून भरपूर काम आहेत , एक आजी, ला पणं घेऊन जायचं आहे जाताना ..

यम: हो जवळ च आहे इथे जाऊ आपण लगेच
घेऊन तिलाही..
( एका कुटुंबात राहत असलेली आजी ने आज आपला प्राण सोडला होता तिला नेण्यासाठी यम आले होते..त्यावेळी प्रीती मागच्या सीट वर बसली होती आणि यम ही मागे बसला होता, व चित्रगुप्त गाडी चालवत होता)

आजी: ( जशी ऑडी आली तशी चालू झाली आजीच्या तोंडाची पट्टी)
आलात तुम्ही लोक वेळ केलात कधी पासून उभी आहे म्हातारं माणूस कधी पासून उभ राहील काही कळत की नाही तुम्हाला..ये यमा हो तिकड बसू दे नीट…जिवंत असताना कधी मारुती कार मध्ये नाही बसता आल् ..चक्क मेल्यानंतर तू ऑडी घेऊन आलास…
यम राज्यात बिझनेस जोरात चालू आहे वाटत.

चित्रगुप्त: आज्जी पुढे या इथे जागा आहे.
आजी: मुड्द्या लवकर बसू द्या की रे कधीपासून गुडघे दुखतात माझे…

( इकडे प्रीती आपल्या दुःखात होतीच , विमान जस हळुवार वर ढगात जात तस ती ऑडी ढगात जात होती असंख्य विचारांचं वादळ शांत करू पाहत होती..)

यम: काय करावं या पोरीला घ्यायला गेलो होतो, तिच्या आई वडिलांना भेटून आलो म्हणून उशीर झाला

आजी: (पोरीला म्हणत तिने मागे वळून प्रीती ला पाहिलं आणि म्हणाली ) अरे देवा परमेश्वरा काय म्हणून पोरीला बोलवतो स रे पोरीच वय काय , अजून तर तिने होणारा नवरा पणं पाहिला नसेल, संसार नाही पहिला, पोर नाही पाहिली देवा देवा..
पोरी काय तोंड पाडू नकोस हे आयुष्य आहे लेकरा कोण कधी जाईल काही सांगता यायचं नाही बघ..

प्रीती: (अजूनच शांत झाली)
आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाली सोड आजी जे आपल नव्हतंच त्यासाठी काय रडाव…

चित्रगुप्त:( यमाला उद्देशून) काय पणं म्हणा देवा ही बेबी मला स्वभावाने जाम आवडली

आजी : भारी बाबा मरणानंतर ऑडी येणार घ्यायला माहीतच नव्हत मला वाटलं म्हशी की रेड्यावर बसून येतो म्हणे यम अस कोणीतरी म्हटल होत…

प्रीती: हसली आणि म्हणाली हो यम काका मलाही तेच वाटलं खरच खूपच छान आहे तुमची ऑडी ब्लॅक ब्युटी खूप आवडली ..

यम: हो तर , त्या म्हशी रेडे ना खूप वेळ लागतो चरायला, वाटेत जाईल तिकडे भूक लागते त्यांना मी काय गवत घेऊन फिरत बसू, मला कधी पणं यावं लागत लोकांना खाली घ्यायला ..मग कधी म्हशीचा सकाळ संध्याकाळ चा वेळ होतो दुधाचा म्हणून म्हटल ऑडी घ्यावी..

प्रीती: छान काका..उत्तम
( यमाला उद्देशून)
सुंदर आहे हा आकाशातला प्रवास खूप सुंदर यम काका तुम्हालाही कधी कुणावर प्रेम झाल का..?

(चित्रगुप्त हसला)

आजी: त्यांना कसल होतय प्रेम त्यांना लोकांचा जीव घ्यायचा माहीत त्यांना थोडीच अस्त हृदय

प्रीती: का नाही आजी त्यांना ही हृदय आहे, म्हणून तर त्यांनी मला आई ,बाबा व प्रतीक ला भेटू दिलं,..

यम: (जरा हळवा च झाला) पोरी ओळखलं स बघ प्रेम फक्त त्यालाच समजत ज्यांना खऱ्या मनापासून प्रेम होत…खूप प्रेम करायचीस ना पोरी त्या “पत्त्या ” बरोबर

प्रीती: यम काका काय हो “प्रतीक” म्हणा

चित्रगुप्त: ( हसून) त्यांना अग सवयच ती टोपण नाव ठेवण्याची …त्यांच्या प्रेयसी ला ही ते यमी म्हणायचे

यम:( लाजले) हो ग प्रेमाने म्हणायचो

प्रीती ; म्हणजे तुमची पणं लव्ह स्टोरी वाव सांगा ना काका

आजी: आता ऐका प्रेम कहाणी …
आमच्या काळात कुठल्या प्रेमाच्या गोष्टी आणि काय लग्न झाल्यावर नवऱ्याच तोंड पहायचं..कधीतरी प्रेमाचं दोन शब्द ऐकायला भेटेल वाटायचं पणं कुठलं काय…

तरीपण मी थोडी सवय लावलीच त्यांना प्रेमाची

प्रीती: खरच मग कस काय बोललात आजी

आजी: ( आजीच नाव पारुबाई) एके दिवशी मी म्हणाली लग्नाची बायको आहे किमान कधीतरी एकदा माज तुझ्यावर प्रेम आहे ग अस काहीतरी म्हणा म्हणजे मला पणं काहीतरी तुमचं प्रेम असल्याचं जाणीव होईल..

मग एके दिवशी यांनी माझा यांच्यावर जडलेला जीव पाहून शेतातून एक गुलाबाच फुल घेऊन आले आणि म्हणाले ” अग ऐक ना हे फुल तुझ्यासाठी ” आजी जरा लाजलीच..

ते आई लव यू काहीतरी म्हणतात तेच ते माझं पणं तुझ्यावर ” आई लब ऊ ” पारू

(यम, प्रीती , चित्रगुप्त सगळे हसत होते..प्रवास आयुष्य संपल्याचा चालू होता पणं यांच्या गप्पांनी एक वेगळाच सूर चालू होता प्रेमाचा आणि त्या प्रेमात राहून खुश राहण्याचा)

प्रीती: (यम ला उद्देशून) काका सांगा ना तुमची पणं कशी स्टोरी आहे सांगा ना

यम: जरा लाजतच होते पणं ..

चित्रगुप्त: म्हणाले मी सांगतो

आम्हाला ही त्यादिवशी सुट्टी होती कुणाला उचलायच नव्हतं..म्हणून आम्ही मस्त सुट्टी एन्जॉय करत होतो..

एके दिवशी सुंदर दिसणारी “यामिका” नावाची एक सावळी मुलगी, देखणी, पायातल्या पैंजनचा आवाज करत ,ती मैत्रिणी सोबत कॉलेज ला जात होती, आणि यामीका ला यांनी त्यावेळी पहिल्यांदा पाहिलं समोरच बसलेल्या एका गाईला खाऊ घातलं …
आणि हसत हसत केसांच्या लटा गालावर येऊन स्पर्श करत होत्या आणि हे तिला पाहतच होते..

यम देवाला..
किती हाका दिल्या हे तर जाम त्यादिवशी कोम्यात गेले होते…

प्रीती: म्हणजे यम लोकांत पणं कॉलेज आहे तिथे पणं शिकतात

चित्रगुप्त: हो तर तिथे ही लागतात ना शिकलेल्या व्यक्ती नाहीतर मृत्यू ची आकडेवारी नोंद करायला ही टॅली केलेली मुल हवीतच ना.. अकाउंट ची मुल पुन्हा कोणत्या कारणाने मेली त्याच डिपार्टमेंट वेगळं, पाप पुण्याचं डिपार्टमेंट वेगळं, आजारी पणात टपकलेली वेगळी, कांड करून आलेली वेगळी इथे पणं डोक्याला काही ताप कमी नाही

प्रीती : हो तर पटलं मला तुमचं

यम: ( लाजत) मला खूप आवडली यमीका आणि तिची प्राण्याबद्दल ची दयाळू वृत्ती, अगदी मला हवी तशी होती ..खूप प्रेम जडल हळू हळू पणं प्रपोज कस करायचं मला काही कळत नव्हत..

चित्रगुप्त: मीच काहीतरी युक्त्या करायचो
नाहीतर हे तर फक्त इतकेच म्हणायचे भर्ड्या आवाजात ” तुझा वेळ झाला आहे बालका, यमलोकी जाण्याचा चल…..मी तुला घ्यायला आलो आहे.

हेच वाक्य एक ठरलेल….

( प्रीती , आजी, यम आणि चित्रगुप्त सगळे जोर जोरात हसत होते) ..

प्रीती : मग काय झालं पुढे काका

चित्रगुप्त: मी पणं एक युक्ती केली
जमिनीवर गेलो होतो असच एका व्यक्तीला घ्यायला यम लोकी यायला पणं तो मेकअप करत होता त्याची वाट पाहत टीव्ही पाहत होतो तेंव्हा पाहिलं होत एका मुलाने ग्रिटींग्ज वगैरे देऊन प्रपोज केलेलं..
मस्त कॅडबरी वगैरे देऊन आणि ती पटली पणं ..

यम: हो पणं यमिका काही कॅडबरी घेऊन पटणारी नव्हती च मुळी,..खूप सुंदर विचार होते तिचे..

असाच वेळ मिळला की तिच्या मागे मागे फिरायचो आणि काहीच न बोलता यायचो..

प्रीती; काय केलात मग नुसते फिरायचाच फक्त.

चित्रगुप्त: नाही एके दिवशी यामिका च यांच्या घरी आली होती भेटायला आणि तीच म्हणाली यम देवांच्या आईला
“आई” तुमचे हे चिरंजीव रोज मला पाहत्तात पणं बोलत काही नाहीत ..प्रेम असून काय फायदा व्यक्त नको का करायला.. बोलायचं ना
“ये यमे माज तुझ्यावर प्रेम आहे म्हणून ” आज बोलेल उद्या बोलेल म्हणत म्हणत वर्ष निघून गेलं..

धन्य ओ यम काका तुम्ही..
( सगळे हसत होते)
चित्रगुप्त: शेवटी यमिका वहिनी नी च पुढाकार घेतला..आणि एकदासं लग्नाचा बार उडवला

दोघं ही समजूत दार आहेत संसार सुखाचा चालू आहे, कधी येताय पासून जेवताय ना ताट केलं आहे पर्यंतचा सर्व प्रवास सुरळीत चालू आहे..

आजी: पोर गुणाची सुखान रहा बाळांनो..

( इकडे हसत हसत प्रीती थोडी शांत झाली)

चित्रगुप्त: काय झालं बेबी शांत झालीस तुझी काही स्टोरी सांगितली च नाहीस की अग बोल मन हल्क होईल

आजी: बोल बाय बोल

प्रीती:Y
काय सांगू काका प्रतीक च असन माझ्या साठी काय होत…

माझ्यात तो माझ्या पेक्षा जास्त होता.
माझ्या पेक्षा तो माझ्यात जास्त होता
सर्व गुण  संपन्न असा पाहताच क्षणी नजरेत भरला होता,
त्याच्या असण्याने सर्व जग खुलुन जायचं माझ
त्याच्या बोलण्याने सर्व जग थांबायचं, बहरायच
पाहत बसावं आणि गुंग होऊन जाऊ असं होऊन जायचं ,

कधी कधी खूप लाजून गालात खळी  यायची
त्याला माझ्या भावना  अगदी अंतःकरणातून सांगायची
पण त्याला समजता  समजत नव्हतं ,
समजत च नव्हतं त्याला
माझ्यापेक्षा तो माझ्यात जास्त होता

रोज नवी खटाटोप रोज नवीन प्रयत्न तरीही
त्याच्या जगात तोच गूंग होता…
मला प्रश्न पडायचा हा असा कसा ” पाषाण “
मन नाही का याला
कातरवेळी मी हैराण परेशान

मी तुझीच आहे रे कधी कळणार तुला करत फिरायची,
आणि हा आपला काहीच समजत नाही उमजत नाही तशी हसून टिकली मारायची
खूप प्रयत्न केले प्रयत्नांती परमेश्वर हाच एक ध्यास होता,
माझ्या पेक्षा तो माझ्यात जास्त होता,

रोज नवी आशा आणि निराशा घेऊन झोपायची ,
आता काही नाही होणार
त्याला काही नाही समजणार म्हणून थोडी थोडी हार मानून च जायची,
शेवटी त्याला ही अधिकार आहे आपल्या भावनांचा,
आपल्या पसंतीचा ,
तरीही मनात हुर हूर फक्त एकच असायची की नाही त्याच्यात ही कुठेतरी आहे मी,
थोड आणि चालू हा खेळ आहे आयुष्याचा,

चालत चालत खूप प्रयत्न केले आणि एक शेवटचा प्रयत्न ही केला,
मनातला सगळा राग काढला
आणि एक साभार पत्र धाडलं,
त्या पत्राने काही जादूच वेगळी केली…
त्यातून मी त्याला हळू हळू कळायला लागली..

कळत कळत कळून गेलं…
त्याच्या भावना त्याला,
शोधू लागला मला होऊन कावरा बावरा,
इतरवेळी त्याच्या उत्तराची वाट पाहणारी मी,
मी खूप दूर निघून गेलेली,
रात्र दिवस वेड्यासारखा वेड लाऊन गेलं होत त्याला..
३ दिवसांनी मला शोध शोधत आला ,
त्याने पाहिलं मला समुद्र किनाऱ्याला,
डोळे दोघांचे ओले झाले हृदयस्पर्शी सगळ बोलून गेला,
बोलता बोलता त्याच्याशी माझा आता पर्यंतचा प्रवास आठवला,
त्याने मिठीत घेतल त्या मिठीत इतक्या दिवसांनी झोप लागली मला,
लहान मुला सारखं रूप पाहून माज
काही तरी कविताच करू लागला
तेंव्हा मात्र नक्की म्हणाला
माझ्या त तू माझ्यात जास्त झाली
आज पर्यंत मी तुला का नाही ओळखली
आज पर्यंत मी तुला का नाही ओळखली

@@@–

(आता पर्यतंच्या यमलोकी चाललेल्या प्रवासात हास्य विनोद चालू होते अचानक प्रितीच्या या प्रेम कवितेने सगळ्यांचे डोळे ओले झाले)

प्रीती : (डोळे पुसत) चालायचं च आयुष्य अस च अस्त…

प्रीती : काका अजून किती वेळ होईल तरी पोहचायला मला खूप भूक लागलीय किमान यमिका काकीना सँडविच वगैरे बनवायला सांगा ना..

यम: हो बाळा सांगतो

चित्रगुप्त: आलोच आहोत जवळ देवा सांगा तुम्ही काहीतरी बनवण्यास आपल्याला ही काहीतरी खाऊन पिऊन पुढच्या डुटी साठी जावं लागेल..

यम: हो

यमलोक मध्ये पदार्पण

प्रीती: सुंदर आहे तुमचं यमलोक काका …

आजी : पोरा मला पणं एक भाकर थाप म्हणावं सांजच्या गोळीचा वेळ झालाय

चित्रगुप्त: हो हो आजी आमच्याइथे खूप सोय आहे काही काळजी करू नकोस..

यमलोकातला सुंदर बगीचा आणि सुंदर नगरी पाहून दोघी ना ही खूप बरं वाटलं पणं पुढची प्रोसेस बाकी होती…इथून पुढे कुठे जायचं कोणत्या डिपार्टमेंट मध्ये जायचं वगैरे….

एकदा शी ऑडी थांबली यमाच्या बंगल्या समोर…
वाह किती सुंदर अप्रतिम …म्हणत म्हणत प्रीती पुढे झाली…

यामिनी उर्फ यामिका ( लग्नानंतर नावात बदल झाला होता)
आल्या आपल्या दासी सोबत आणि पाहुणचार चालू झाला…
या या आपण इथे आसन ग्रहण करून घ्या आपल्यासाठी नाश्त्याची सोय केली आहे ..फ्रेश होण्यासाठी इथे समोर वॉश रूम आहे जाऊ शकता..

प्रीती: किती छान आहात तुम्ही यामिका काकी सुंदर तुमची लव स्टोरी ऐकली मी खूप आवडलं मला तुमचं प्रेम ..

यामिका: प्रीती थंक यु….

चित्रगुप्त: लागलीच आपल्या कार्याला सुरुवात केली कॉम्प्युटर ऑन करून दोघीच यम लोकी आणण्याचं स्टेटस अपडेट करायचं होत, एन्ट्री करायची होती…

त्यामुळे ते काम करत होते…
प्रीती: आजी किती सुंदर आहे ना ग इकडे सर्व

आजी: हो तर बर झालं बाई रोज सकाळ संध्याकाळ फिरायला जाईन बघ इथून
प्रीती : (हसत होती) पणं काय माहित एक वेगळच तेज होत तिच्या चेहऱ्यावर

नाष्टा करून झाला आणि प्रीती सहजच चित्रगुप्त च्या कॉम्प्युटर च्या भल्या मोठ्या रूम मध्ये जाऊन उभी राहिली…

तेव्हा आजीचा चा स्टेटस अपडेट झाला होता लगेच

पणं

पण प्रीतीचा डाटा अपडेट होत नव्हता..

एंट्री इन व्यालिड दाखवत होत..

( चित्रगुप्त गोंधळ लेला पाहून प्रीती म्हणाली)

प्रीती: चित्रगुप्त काका काय झालं काही प्रॉब्लेम मध्ये दिसत आहात…
बोला मी काही मदत करू का..?

चित्रगुप्त: ……??
तुझी एन्ट्री ॲक्सेप्ट नाही होत बाळा..
बाकीचे सर्व कॉम्प्युटर प्रीती च्या एन्ट्री ला ॲक्सेप्ट च करत नव्हते..

मग शेवटी ब्रह्मांड लोकी यमाने कॉल केला तर तिथे त्यांचं सॉफ्टवेअर अपडेट झालं आणि डाटा पुन्हा लोड होउ लागला,…

लोड होताना यम लोकातले सर्व कर्मचारी आणि सर्व व्यक्ती एकच नजर रोखून पाहत होते कारण आज पर्यंत अस कधी घडल नव्हत
जशी इंडिया वर्ल्ड कप क्रिकेट पाहताना असते तशी प्रितीच्या बाबतीत सर्वजण एकटक त्या कॉम्प्युटर कडे पाहत होते ..

आणि अपडेट झालेलं …
“””””प्रीती इज नॉट डेड शी इज लाईव्ह….
तथास्तु तथास्तु….””””””””

ती स्वतः तर गोंधळून गेलीच होती
एक आणि एक व्यक्ती तिच्याकडे पाहत होती काय हा चमत्कार अस कस घडू शकत…

तेंव्हा पुन्हा चित्रगुप्त ने डाटा बद्दल माहिती पत्रिका जाहीर केली आणि सर्वांना वाचण्यास दिली..

तेंव्हा त्यात लिहिलं होत ..
प्रीती,…ने तिच्या आयुष्यात खूप मनापासून प्रेम केलं , तिने आपल्या आसपासच्या लोकांना प्रेमाची परिभाषा शिकवली,…एके दिवशी देवाकडे निर्मळ मनाने प्रतीक सोबत आयुष्य जगण्याची इच्छा व्यक्त केली आणि देवाने लागलीच तिला “तथास्तु तथास्तु” चा वरदान दिलं..

तेच डाटा इन व्यालीड येत होत..

चित्रगुप्त आणि आजी यम यमिका , तिथला कर्मचारी सर्वजण तिचे अभिनंदन करत होते…

म्हणजे प्रीती तर काय करू आणि काय नाही अशी डोळ्यातून आनंदआश्रू वाहत होते म्हणजे मी आता आई बाबा कडे जाणार मी प्रतीक ला भेटू शकेन ..इकडे तिकडे.सांगत फिरत होती …

म्हणतात ना
“इश्क की जुबा कोई जाणे न जाणे
खुदा तो जाणता ही है”

आजी : बर झालं बाय सुखाचा संसार कर.माझा आशीर्वाद हाय तुला..

यम: खूप चांगली आहेस तू बाळ , खुश रहा.

चित्रगुप्त: आयुष्यात काहीही प्रॉब्लेम आला तर आवाज दे बेबी मी मदतीला येईन नक्की..

म्हणत तिने सांगावा घेतला ..
पुन्हा तिचा आदरातिथ्य करून पाहुणचार करून तिला चित्रगुप्त ने ड्रायव्हर ला सांगून हॉस्पिटल ला सोडून येण्यास सांगितल .

आता पुन्हा परतीच्या वाटेला जात असताना ती आई बाबा आणि प्रतिकचा च विचार करत होती काय झालं असेल त्यांचे हाल आणि काय आणि काय..?

मी येते मी येते आहे…..प्रतीक … म्हणून ऑडी तून ओरडुन ओरडुन आकाशाला , ढगांना, ताऱ्याना, वाऱ्याला, चांदण्याना, चंद्राला, सांगत होती….

@

( जमिनीवर खाली उतरली )
हॉस्पिटल मध्ये जातानाच तिने पाहिलं आई बाबा नचे हाल पाहून निशब्द होत ते सगळ …

आईने माझा हात धरून ठेवला होता मी जशी प्रवेश केला माझ्या शरीरात तश्या मशीन वर माझ्या झोपलेल्या आयुष्याच्या रेषा जागृत होत होत्या
तिला माझी हालचाल जाणवली, डॉक्टर्स पाहत होते काय हे आश्चर्य ….तिच्या तला प्राण येत होता तसा त्यांच्या तला गेलेला प्राण परत येत होता…

प्रतीक हॉस्पिटल मध्ये नव्हता तो तिथेच एका ठिकाणी कुठेतरी जाऊन शांत बसला होता जवळच एक मंदिर होतं प्रार्थना करत होता…
माझी प्रीती मला परत दे देवा म्हणून म्हणून दमून गेला होता, अश्रू सुकले होते .आणि हातात ते मंगळ सूत्र घेऊन एकटक पाहत होता….

आणि निशब्द झाला होता..

इकडे आई बाबा प्रीती शुध्दीवर येताना पाहून ढसा ढसा रडत होते आणि चित्रपटातला एखादा सीन व्हावा तसा आश्चर्य च काहीतरी घडत होत…डॉक्टर ना विश्वास बसत नव्हता..पणं डॉक्टर बोलले हा काही चमत्कार च आहे..

प्रीती बरी होईल आशा आहे..

तिचे बाबा देवाचे अगणित आभार मानत होते..प्रतीक ला शोधू लागले,..

जसा प्रतीक दिसला तसा त्याला ही आनंदाची बातमी सांगितली प्रतीक च्या कानावर विश्वास बसत नव्हता , ज्या पद्धतीने धावत सुटला होता तिला पाहायला ती धाव पाहणारे अचंबित होत होते….

एकदा सा तिचा हलणारा देह पाहून थांबलेले अश्रू पुन्हा वाहू लागले….
काहीतरीच चमत्कार घडला होता..
डॉक्टरांनी सांगितलं पूर्ण शुधित येऊ द्या मग पेशंट जवळ पाठवू..
तब्बल २ दिवसांनी तिने नीट डोळे उघडले आणि आई , बाबा आणि प्रतीक ला पाहिलं…

तिचा पुनर्जन्म च होता तो….आई बाबा हात पकडुन हसत हसत थोड डोळ्यातून पाणी निघतच होत पणं त्यांतून ही स्वतः ला सावरत म्हणू लागले लवकर बरी हो बाळा , तुझ्याशिवाय काही नकोय बाळा तू लवकर बरी हो,

प्रीती : हो आई

डॉक्टरांनी जास्त बोलण्यास परवानगी दिली नव्हती , कारण तिचा अपघात खूप मोठा त्यात तिला झालेल्या जखमा भरायला वेळ लागणार होता, म्हणून आरामाची खूप गरज होती ..

(आई बाबा गेले रूम च्या बाहेर)

प्रतीक: निशब्द तिचा हात आपल्या दोन्ही हातात घेऊन डोक टेकून शांत बसला होता .
म्हणाला च शेवटी राहवेना त्याला…
का गेलेली स असा एकटा सोडून मला..श्वास अटकत होता माझा…मला प्रेमात जगायचं शिकवून तू स्वतः मला सोडून जात होतीस…?

प्रीती: मी तुला सोडून कुठे नाही जाणार,..
तूझ्या सोबत राहून तुझी काळजी घेणार, आणि खूप सतवणार देखील..

प्रतीक: तुला काय सतवायच आहे सतव पणं प्लीज अस पुन्हा सोडून जाऊ नकोस …मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय ..
जेवलास का? नाष्टा झाला का ? लवकर उठ पासून कसा आहेस ? काळजी घे नीट सांभाळून जा म्हणणारी तू मला हवी आहेस..
आवाजाने ओळखणारी पणं खूप आहेत समोरचा व्यक्ती दुःखात आहे की सुखात आहे पणं तू तर मला न पाहता ही ओळ खतेस मी कसा आहे ..माझा मूड कसा आहे..काय करत असेन मी,..किती काळजी घेतेस तू माझी …

तुझ्याशिवाय कसा जगेन ग

प्रीती: आहे मी बरी आता विसरून जा जे झालं ते..

प्रतीक: हो तू बरी हो आपण वेळ देऊ एकमेकांना, प्रेम पणं करू, भांडू देखील , एकमेकांना समजावू, आणि खूप सार एकमेकांस सोबत जगू…

मी आता या क्षणी च तुझ्या सोबत लग्न करणार आहे आई बाबांशी मी बोलून घेतल आहे.तयार आहेस ना तू ..?

जेंव्हा पासून तुझी ही घटना ऐकलीय तेंव्हापासून मंगळ सूत्र घेऊन फिरतोय एकदास तुला आपल करायचं आहे…की पुन्हा कुठे तू दूर न जाविस मला सोडून..

प्रीती: हो तयार आहे मी

( इकडे चित्रगुप्त आपल्या कॉम्प्युटर वर प्रितीचे अपडेट पाहतच होता की त्याला समजल तीच दवाखान्यात मध्ये च लग्न होणार आहे तर त्याने सर्वांना सांगितलं)

काहीच वेळात दवाखाना फुलांनी सजवला गेला आणि प्रतीक ने प्रीती च्या गळ्यात मंगळ सूत्र घालून तीच स्वप्न पूर्ण केलं जे ती मेल्यानंतर हातात घेऊन रडत होती की हे स्वप्न माज स्वप्न च राहील..

पण “”‘स्वप्नात ही जीव असतो कारण त्या स्वप्नांना आपण जीव लावतो”””

( प्रीतीला लग्न झाल्यावर आकाशातून फुले पडताना दिसत होती तेंव्हा ती वर डोक वर करून पाहते तर काय चित्रगुप्त, आजी, यम, यमिका, तिकडचा कर्मचारी वर्ग, दासी सर्वजण भरभरून शुभेच्छा देत होते)….

ती त्या जगात जाऊन आली होती म्हणून ते जग आणि त्या जगातले लोक फक्त तिलाच दिसायचे…

अश्यारीतीने प्रीती आणि प्रतीक यांची लव स्टोरी काह वेगळीच होती…

काही महिन्यांत तिच्या जखमा दुखापती बऱ्या झाल्या…ती पुन्हा आपल्या जीवनात पूर्ववत झाली.

@___
या कथेतून सांगण्यासारख हे आहे की चमत्कार फक्त चित्रपटात तच होत नसतात खऱ्या आयुष्यात पणं होतात….
म्हणतात ना प्रार्थना, श्रद्धा, विचार, स्वप्न, निष्ठा, विश्वास दृढ, प्रामाणिक असतील तर दुवा कबूल हो जाती है….

“उसके घर देर है अंधेर नहि, हमेशा याद रखणा”

म्हणून जे पणं असो आयुष्यातील भावना पूर्ण प्रामाणिक असावी आणि प्रत्येकवेळी चमत्कार होईलच अस नाही कारण तेंव्हा नशिबाचे फासे कसे पलटतील नाही माहीत…तेंव्हा पणं प्रामाणिक पना आणि पूर्ण विश्वास ठेवायचा च कारण त्याच फळ एक ना एक दिवस देव देतोच

पुरातन काळात देखील यज्ञ व्हायचे नामस्मरण केलं जायचं आणि देव प्रसन्न व्हायचे आणि जप करणारी व्यक्ती काहीतरी वरदान मागायची सेम थेरपी आहे ही सुद्धा मनापासून श्रद्धा असलेली कोणतीही गोष्ट देव फळ देवो न देवो पणं देव नक्कीच आपल्या कॉम्प्युटर मध्ये फिट करून ठेवत असतो .

आज तिच्या पहिल्या लेखातील कडवी आठवली

“आपकी मोहब्बत अगर सच्ची हो ,
तो उसे मिलाने की कोशिश पुरी
कायनात कर ही लेती है…..”

http://linkmarathi.com/आणि-कविता-जिवंत-राहिली/

रुपाली शिंदे
आजरा

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular