Homeघडामोडीअक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी ते मुळक्षेत्र मेतगे भक्तीयात्रा

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी ते मुळक्षेत्र मेतगे भक्तीयात्रा

आनुर /ता. कागल

बाळूमामा ट्रस्ट, मेतगे व परिवर्तन सामाजिक संस्था कौलगे यांच्या संयुक्त विद्यमाने सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
थोर कर्मयोगी वारकरी सत्पूरुष सद्गुरू बाळूमामा व मामांचे आराध्य दैवत श्री हलसिध्दनाथ यांना वंदन करणाऱ्या या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्ट व परिवर्तन संस्थेने केले आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष पापा पाटील -कौलवकर व परिवर्तन संस्थेचे मुख्य प्रवर्तक ह.भ.प. सचिन पवार म्हणाले बाळूमामा हे वारकरी सत्पूरुष होते. आयुष्यभर त्यांनी लोकांना ईश्वर भक्तीचा उपदेश केला. स्वतः ते श्री हलसिद्धनाथ व पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. त्यांना वंदन करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले आहे.
अक्षयतृतीयेला (3 मे) सकाळी 7 वाजता तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी येथून भक्तीयात्रेला प्रारंभ होईल. म्हाकवे – आनूर – बस्तवडे – हमीदवाडा या मार्गाने मुळक्षेत्र मेतगे येथे भक्तीयात्रेचा समारोप सायंकाळी 5 ते 7 या वेळेत ह.भ.प. सचिन पवार यांच्या कीर्तनाने व आरती करून महाप्रसादाने सांगता समारोप होईल.
तरी या भक्तीयात्रेच्या सोहळ्यात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्ट व संस्थेच्या वतीने केले आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular