दीपावली

दीपावली ही दिपपर्वाची,
आनंदाची उत्साहाची .
चैतन्याच्या अनुभूतीची ,
प्रकाशमान बनण्याची .

वसुबारस पवित्र ऐशी,
गोमातोच्या पूजनाची.
गायीसंगे वासराशी,
मनोभावे पूजण्याची.

धनत्रयोदशी धनपूजनाची ,
धन्वंतरीच्या उपासनेची
कास धरू या आरोग्याची
सदैव निरोगी राहण्याची

नरकासुराचा वध करूनी,
श्रीकृष्ण विजयी होण्याची.
संदेश देई नरकचतृर्दशी ,
सत्याचा विजय होण्याची.

आराधना श्री लक्ष्मीची ,
लक्ष्मीपूजन दिवसाची .
समृद्धीची अन् उंन्नतीची,
वरप्रसाद तो मिळविण्याची.

बलिप्रतिपदा बळीराजाच्या ,
कर्तुत्वाशी जपण्याची .
आरंभा़शी शुभकार्याच्या ,
मुहूर्त साधुनी घेण्याची .

भाऊबीज ती नितांत सुंदर ,
बंधूभगिनीच्या उदात्त प्रेमाची .
विश्वामधुनी मिळवी आदर ,
पवित्रतेच्या नात्यांची .

दीपावली ही वैभवाची
सम्राज्ञी सर्व सणांची
भेदाभेद मिटविण्याची
माणुसकीशी जपण्याची

दिपावलीच्या आपणा सर्वांस लक्ष लक्ष शुभेच्छा

             रेवाशंकर वाघ ठाणे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular