धर्मवीर

तसें पाहायला गेले तर मला सत्य घटनेवर आधारित सिनेमा पाहायला खूप आवडते. सहसा मी कधी सिनेमा हॉल मध्ये जाऊन बघत नाही. पण सत्य घटनेवर असलेले सिनेमे मला सिनेमा हॉल मध्ये जाऊन बघायला आवडते. चार वर्षां पूर्वी मी ठाकरे हा सिनेमा मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन पाहिला होता. 2 दिवसां पूर्वी धर्मवीर हा सिनेमा पाहिला.
ठाणे शहरातील एके काळचे शिवसेना जिल्हा प्रमुख असलेले आनंद दिघे यांच्या कार्यावर आधारित हा सिनेमा आहे. सोशल मीडिया मध्ये जेव्हा या सिनेमाचा व्हिडिओ पाहिला होतो तेव्हा ठरवले होते कि, हा सिनेमा पाहायला हवा.
ऑफिस मधून येताना एक चौक लागतो तेथे सिग्नल आहे. हा सिनेमा जेव्हा येणार होता तेव्हा मोठा स्टॅचू लावला होता. प्रसिध्द अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे साहेबांची भूमिका खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. तो स्टेचू पाहून मी आनंद दिघे आणि त्यांची भूमिका करणारे प्रसाद ओक यांच्या अक्षरशः प्रेमात पडलो.
प्रसाद ओक यांचे खूप सिनेमे मी पाहिलो आहे. या सिनेमाचा व्हिडिओ पाहून मी खूप उत्साहित झालो. प्रसाद ओक यांनी ही भूमिका खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. साहेबांची भूमिका यांच्या पेक्षा कोणालाच जमणार नाही.
रात्री 9.30 च्या शो ला मी गेलो होतो. प्रसाद ओक यांचा पेहराव आणि देह बोली अगदी साहेबां सारखी अगदी हुबेहूब रेखाटली आहे. डोळ्यांची हालचाल अगदी दिघे साहेबां सारखी. वाह! मस्त अप्रतिम.
सुरवातीला दिघे साहेबांची पुण्य तिथी 2021 या साली असते हे दाखवण्यात आले आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे समुदाय त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तेथे जमलेले असतात. साहेबांचे काहीतरी देणे लागते यासाठी अखंड समुदाय जमलेला असतो. त्यांना साहेबांनी पूर्वी कशा प्रकारे मदत केली होती हे दाखवण्यात आले आहे.
साहेबांची राहणीमान अगदी साधी होती. साधे चप्पल ते घालत होते.खांद्यावर छोटासा टॉवेल असायचा. दाढीवर हाताने गोंजारत तसेच मधेच हाताची बोटे दाबणारे पाहून मी त्यांच्या देह बोलीच्या प्रेमात पडलो.
घरोघरी तसेच आदिवासी भागात जाऊन त्यांनी शिवसेना पोहोचवली. नगरपालिका निवडणुकीत भरघोस मताने पहिला शिवसेना उमेदवार निवडून आणला. महापौर निवडणुकीत स्वतःच्या चार नगर सेवकांनी साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला. ते खूप दुःखी झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः फोन केल्यावर आपल्या रागावर संयम ठेवण्याचा प्रयत्न करतेले प्रसाद ओक यांनी बोलण्याची छटा वाह खूप सुंदर पद्धतीने केली आहे.
दंगली मध्ये एका स्त्रीच्या घरावर समाज कंटक लोक हल्ला करतात तेव्हा ती रणरागिणीचे रूप पाहून तिचे कौतुक वाटते. ते दृश्य पाहताना माझे डोळे पाणावले.
जनता दरबार मध्ये त्यांनी सर्व सामान्य लोकांची कामे करतेले दाखवली आहेत. एक मुसलमान व्यक्ती आपल्या मुलाला शाळेत प्रवेश मिळत नाही म्हणून येतो. साहेबांनी लगेच लेटर हेडवर लिहून त्यांच्या हाती देतात. ते वाचताना तो व्यक्ती म्हणतो, यावर साहेब शाळेचे नाव लिहिले नाही. त्यावर साहेब म्हणतात माझे जय महाराष्ट्र असलेले पत्र पाहून काम होते. त्या मुलाचे ऍडमिशन चांगल्या शाळेत होते. साहेब तेव्हा म्हणतात कि, माझा टोपी घालणाऱ्या मुसलमान लोकांवर राग नाही तर ज्यांच्या टोपीच्या खाली जिहाद असणारे डोके आहे त्यांचा द्वेष आहे.
बलात्कार झालेल्या मुलीचे आई वडील साहेबांच्या दरबारात येतात. तेव्हा त्या मुलीचे वडील एक ओढणी घेऊन येतात आणि त्यांना सांगतात कि, दीड वर्षां पूर्वी माझ्या मुलीवर बलात्कार झाला होता, कोर्टात केस चालू होती पण आरोपी निर्दोष सुटला, आणि माझ्या मुलीने याच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली, माझ्या मुलीने शेवटचे लिहिले होते कि, हि ओढणी दिघे साहेबांच्या पायावर ठेवा. साहेबांनी लगेच आपल्या माणसांना सांगतात कि, त्याला पकडा आणि मी येऊ पर्यंत त्याला जिवंत ठेवा. साहेब तेथे जातात आणि त्या आरोपीला मारायला लावतात. ती ओढणी घेऊन म्हणतात कि, तायडे हीच ओढणी कंबरेला बांधून माझ्याजवळ आली असती तर माझ्या जागी तू येथे बसून त्या माणसाला मारली असती. ते दृश्य पाहून मला रडायला आले. स्त्री बद्दल इतका आदर शब्दांत सांगू शकणार नाही, इतके त्यांनी केले आहे.
सर्वच लोक राजकारणी नसतात तर कांही आनंद दिघे असतात. हे वाक्य समजण्यासाठी एकदा हा सिनेमा सर्वांनी पाहायलाच हवा. प्रसाद ओक यांच्या शिवाय हि भूमिका कोणालाच जमली नसती. त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. श्रुती मराठे यांनी रिपोर्टरची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. स्नेहल तरडे यांनी शिवसेना महिला अध्यक्ष यांचे पात्र खूप म्हणजे खूप सुंदर रित्या पेलले आहे. डॅशिंग लुक तर जबरदस्त. गश्मीर ने मुसलमान व्यक्तीचा अभिनय सुरेख पद्धतीने रेखाटला आहे. शिवराजने आनंद दिघे यांच्या तरुण पणाची भूमिका चांगली मांडली आहे. अत्यंत साधा स्वभाव आणि साधे राहणीमान पाहताना त्याचे कौतुक वाटते. डायरेक्टर, लेखक प्रवीण तरडे यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांचे सुद्धा खूप खूप कौतुक. त्या सर्वांनाच माझ्याकडून पुढील प्रोजेक्ट साठी शुभेच्छा.


आमच्या कंपनी मधील माझा मित्र श्री. निखिल चव्हाण हा प्रसाद ओक यांच्या घराजवळ राहतो. माझा मित्र त्यांची आणि माझी भेट घडवून आणणार आहे. ती भेट माझ्यासाठी नेहमी लक्षात राहण्या सारखी असेल.
जय महाराष्ट्र.

लेखन- श्री.सनी चंद्रकांत कुंभार.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. नमस्कार सर🙏
    आपली लेखणी “धर्मवीर” पुन्हा नव्याने शिकवून गेली.
    खरंच आज आनंद दिघे साहेब हवे होते. आपल्या अभिनयाचा हुबेहूब अवतार पाहून त्यांनी प्रसाद ओक यांना मिठी मारून म्हणाले असते. “अरे मी फक्त माणूस आहे, खरा धर्मवीर तर तू साकारला आहेस.”
    प्रसाद सरांनी त्या भूमिकेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. परंतु याच धर्मवीराचा व्यासंग आपण आपल्या लेखणीने शब्दबद्ध केला आहे त्याला तोड नाही. ही आपली प्रशंसा नाही, तर आपल्या लेखणीला, आपल्या शब्दांच्या भावनेतल्या स्पंदनांचा माझ्या मनातला आदर आहे.

    लेख वाचताना जिथे जिथे मन भावलं आणि हृदयात कुठेतरी धर्मवीर साठी आदर निर्माण होणारी शब्दसंगत आहे, तिथे तिथे अंग शहारून नकळत आपोआप डोळ्यांतून अश्रू निझरते झाले.

    राजकारण म्हटलं की, वाद विवाद येतातच पण या कचाट्यातून रस्ता काढत बाहेर आपल्या अवती भोवती असलेल्या जनतेसाठी काय केलं पाहिजे आणि राजकारणी माणसाने जगावे कसे, जनतेसाठी आपली वागणूक कशी असावी हे शिकायचे असेल तर माझ्या मते प्रत्येक राजकारणी माणसाने हा चित्रपट एकदा पहावा ; आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या चारित्रातून शिकावे.

    आपल्या लेखणीला सलाम…!!
    आपली लेखणी अशीच वृध्दींगत होवो.
    🚩जय शिवराय🚩

- Advertisment -spot_img

Most Popular